अहमदाबाद, 30 सप्टेंबर : सामान्यपणे रस्त्याने अॅम्ब्युलन्स जात असेल तर अॅम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करून दिला जातो. कितीही वाहतूक कोंडी असली तरी इतर गाड्या बाजूला थांबतात आणि सर्वात आधी अॅम्ब्युलन्सला जाऊ दिलं जातं. पण बऱ्याच वेळी तुम्ही पाहिलं असेल एखादा बडा नेता येणार असेल तर त्यासाठी इतर गाड्या थांबवल्या जातात. पण अशावेळी रुग्णवाहिका आली तर काय? आणि जर तो बडा नेता पंतप्रधान असेल आणि त्यांचा गाड्यांचा ताफा आणि अॅम्ब्युलन्स एकत्र आली तर काय होईल किंवा काय केलं जाईल? हे तुम्ही प्रत्यक्षच पाहा ना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांच्या ताफ्याजवळ एक अॅम्ब्युलन्स आली. तेव्हा मोदींनी स्वतः अॅम्ब्युलन्ससाठी आपल्या गाड्यांचा ताफा रोखला. अॅम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करून दिला. आपल्या गाड्यांआधी अॅम्ब्युलन्सला पुढे जाऊ दिलं. गुजरातमधील हे दृश्य आहे. पंतप्रधान मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
#WATCH | Gujarat: Prime Minister Narendra Modi, en route from Ahmedabad to Gandhinagar, stopped his convoy to give way to an ambulance pic.twitter.com/yY16G0UYjJ
— ANI (@ANI) September 30, 2022
पीएम मोदी आज अहमदाबाद दौऱ्यावर होते. तिथून ते परतत होते. तेव्हा अहमदाबाद-गांधीनगर मार्गावर ही अॅम्ब्युलन्स जात होती. मोदींनी ते पाहिलं आणि अॅम्ब्युलन्सला रस्ता दिला. अॅम्ब्युलन्स गेल्यानंतर मोदींच्या गाड्यांचा ताफा पुढे गेला.
हे वाचा - Vande Bharat Train: मुंबईतून फक्त सहा तासांत गाठता येणार गुजरात! वंदे भारत ट्रेनचं वेळापत्रक जाहीर
मोदींनी आज गांधीनगर आणि मुंबईदरम्यान चालणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झोंडा दाखवला. मोदींनी या ट्रेनमध्ये बसून गांधीनगर ते अहमदाबादच्या कालुपूर स्टेशनपर्यंत प्रवासही केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pm modi