मराठी बातम्या /बातम्या /Viral /100 रुपयांच्या जुन्या पर्सने केलं मालामाल; एका रात्रीत लखपती बनली तरुणी; कसं ते पाहा

100 रुपयांच्या जुन्या पर्सने केलं मालामाल; एका रात्रीत लखपती बनली तरुणी; कसं ते पाहा

जुनी पर्स ठरली लकी

जुनी पर्स ठरली लकी

तरुणीने जुनी पर्स 100 रुपयांना खरेदी केली पण त्यापासूनच तिने तब्बल 7 लाख रुपये कमावले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

वॉशिंग्टन, 31 मार्च : कोणतीही वस्तू जुनी झाली की ती आपण फेकून देतो. अगदी आपली जुनी पर्ससुद्धा. पण एका महिलेला अशाच जुन्या पर्सने मालामाल बनवलं आहे. ही पर्स तिने फक्त 100 रुपयांत खरेदी केली होती. पण त्यामुळे ती लखपती बनवली आहे. तब्बल 7 लाख रुपये तिला मिळाले आहेत. 100 रुपयांच्या जुन्या पर्समुळे तिचं नशीबच पालटलं आहे.

अमेरिकेत राहणारी 29 वर्षांची चँडलर वेस्ट, जी एका ऑनलाईन लिलावात सहभागी झाली होती. तिथं एक पर्स होती जी तिला खूप आवडली. ही पर्स तशी जुनी होती, त्याची किंमतही फक्त एक डॉलर म्हणजे जवळपास 100 रुपये होती. त्यामुळे चँडलरने ती पर्स खरेदी केली. पर्स खूप जुनी वाटत होती त्यामुळे उघडून पाहण्याचं तिनं ठरवलं. पण आपल्याला इतक्या आवडलेल्या आणि लिलावात शंभऱ रुपयात घेतलेल्या या पर्सची खरी किंमत किती असावी, हे जाणून घेण्याची उत्सुकताही तिला होती. त्यामुळे तिने या पर्सचा फोटो सोशल मीडियावर टाकला.

अंडं आधी की कोंबडी सोडा, आता चिकन पक्षी की प्राणी यावरून वाद; प्रकरण कोर्टात

सोशल मीडियावर पोस्ट करत तिने या पर्सबाबत नेटिझन्सना विचारलं. प्राचीन वस्तूंचं ज्ञान असलेल्या तज्ज्ञांनी ही पर्स ओळखली. ही लक्झरी फ्रेंच ब्रँड कार्टियर पर्स आहे, जी 1920 साली बनवली गेली होती, असं तिला तज्ज्ञांनी सांगितलं. त्यांनी तिला ती पर्स ज्वेलर्सकडे नेण्याचा सल्लाही दिला.

त्याप्रमाणे चँडलर ती पर्स घेऊन ज्वेलर्सकडे गेली. तेव्हा तिथं तिला त्या पर्सबाबत जे समजलं ते ऐकून ती थक्कच झाली, तिला सुखद धक्का बसला. कारण ती जुनी पर्स साधीसुधी नव्हती. त्या पर्सवर तब्बल 12 खरे हिरे जडवलेले होते. ज्याची बाजारात ४ हजार डॉलरपेक्षाही जास्त किंमत असावी, असं त्यांनी सांगितलं. पण प्रत्यक्षात ही पर्स ज्वेलर्सने सांगितलेल्या किमतीपेक्षाही महाग असल्याचं समोर आलं. या बॅगचा लिलाव 9,450 डॉलर्स म्हणजे सुमारे 7.8 लाख रुपयांना झाला.

अबब! इतका मोठा उंदीर कधी पाहिला आहे का? कुठे सापडला हा पाहा VIDEO

100 रुपयांना खरेदी केलेली ही जुनी पर्स तब्बल  7.8 लाख रुपयांना विकली गेली. 100 रुपयांच्या जुन्या पर्समुळे चँडलरचं नशीब एका रात्रीत पालटलं असंच म्हणायला हवी.

First published:
top videos

    Tags: Viral, Viral news