मुंबई, 25 फेब्रुवारी : गाणं ऐकलं तर किती तरी लोकांचं शरीर आपोआप थिरकू लागतं. नाचता येत (Dance Viral Video) असलं किंवा नसलं तरीसुद्धा गाणं ऐकलं की अंगावर एकप्रकारे संचारतं आणि मग त्यावेळी ती व्यक्ती उत्साहात काय करते याचं भान तिलाही राहत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक व्यक्ती डान्स करता करता असं काही करते, की ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही शॉक व्हाल पण तुम्हाला हसूही आवरणार नाही. अक्षरशः पोट धरून तुम्ही हसाल. या व्यक्तीचा जोश पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.
व्हिडीओत पाहू शकता काही व्यक्ती बसलेल्या आहेत तर काही व्यक्ती डान्स करताना दिसतात आहेत. बसलेल्या व्यक्तींपैकी एक व्यक्तीही गाण्यावर थिरकू लागते. बसल्या बसल्याच हात वर करून ही व्यक्ती नाचू लागते. अखेर या व्यक्तीला गाणं ऐकून इतका जोश चढतो की ती जागेवरून उठते आणि नाचू लागते.
हे वाचा - अरे देवा! हे पाहण्याआधी आम्ही...; Maggi PaniPuri video पाहून भडकले नेटिझन्स
खरा शॉक तर पुढे बसतो, जेव्हा ही व्यक्ती नाचता नाचता असं काही करते, ज्याचा कुणी विचारही केला नसेल. ही व्यक्ती डान्स करताना सोफ्यासारखं दिसणारं एक फर्निचर आपल्या हातात उचलते आणि ते फर्निचर हातात धरूनच नाचू लागते.
View this post on Instagram
या व्यक्तीला असं काही करताना पाहून जितका धक्का तुम्हा आम्हाला बसला त्यापेक्षा जास्त तिथं उपस्थित लोकांना. इतर लोकांनी डान्स करणं थांबवलं आणि या व्यक्तीकडेच पाहत राहिले.
हे वाचा - भांगडा करत नवरीबाईची लग्नाच्या स्टेजवर एन्ट्री; Dance Video चा इंटरनेटवर धुमाकूळ
sakhtlogg नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. याने कोणता डोस घेतला आहे, असं मजेशीर कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. यावर तशाच मजेशीर कमेंटही येत आहेत. या व्यक्तीचा उत्साह, जोश याचं कौतुक केलं जातं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Dancer, Funny video, Viral