मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking! मृतदेहाच्या तपासणीसाठी शवगृहात गेले डॉक्टर; जे दिसलं ते पाहून हादरले

Shocking! मृतदेहाच्या तपासणीसाठी शवगृहात गेले डॉक्टर; जे दिसलं ते पाहून हादरले

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

व्यक्तीच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेहाची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांची टिम आली, तेव्हा धक्कादायक खुलासा झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

कॅनबेरा, 07 ऑक्टोबर : अवयवदानाबाबत सध्या बरीच जनजागृती झाली आहे. त्यामुळे लोक जिवंत असताना अवयवदानाची प्रतिज्ञा घेतात. मृत्यूनंतर आपले अवयव दान करतात. ऑस्ट्रेलियातील एका 55 वर्षांच्या व्यक्तीनेही अवयवदान केलं होतं. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर अवयवदानाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून त्याच्या मृतदेहाची तपासणी करायला डॉक्टर शवगृहात गेले. तेव्हा जे दिसलं ते पाहून सर्वांना घाम फुटला.

पर्थमधील हे धक्कादायक प्रकरण. बिझनेस न्यूजच्या वृत्तानुसार 55 वर्षांचा केविन रीडला रॉकिंगहम जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 5 सप्टेंबपला रुग्णालयातील नर्सनी केविनचा मृत्यू झाला म्हणून त्याचा मृतदेह बॉडी बॅगमध्ये पॅक केला आणि शवगृहात पाठवला.

हे वाचा - नवी 'लेडी बाबा वेंगा', एलिझाबेथ यांच्या मृत्यूची या मुलीची भविष्यवाणी ठरली खरी!

केविनने मृत्यूआधी आपलं अवयवदान केले होते. त्यामुळे त्याच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या मृतदेहाची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम शवगृहात केली. डॉक्टरांनी मृतदेह पाहताच त्यांना धक्का बसला. मृतदेहाचे डोळे उघडे होते आणि त्याच्या तोंडातून रक्त येत होतं. रक्त नुकतंच तोंडातून बााहेर आलं होतं.

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार रुग्णाचे डोळे उघडे होते आणि त्याच्या गाऊनवर रक्त होतं. बॉडी बॅगमध्ये त्याच्या शरीराची स्थितीही बदलली होती. कदाचित रुग्ण जिवंत होता आणि तो बॉडी बॅगमधून बाहेर येण्यासाठी धडपड करत होता. पण नंतर गुदमरून त्याचा मृत्यू झाला.

हे वाचा - खोकल्याच्या औषधामुळे 66 मुलांनी गमावला जीव? WHOच्या दाव्याने खळबळ

त्यानंतर धक्कादायक खुलासा झाला. डॉक्टरांनी केविनला मृत घोषित केलं नव्हतं. मृत्यू झाल्याचं प्रमाणित करण्यासाठी कोणत्या डॉक्टरलाही बोलवण्यात आलं नाही.  नर्सना तो मृत झाला असं वाटलं म्हणून नर्सनीच त्याला शवगृहात पाठवलं.  नर्सचा बेजबाबदारपणा समोर आला.  दरम्यान आता या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

First published:

Tags: Viral, World news