मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

खोकल्याच्या औषधामुळे 66 मुलांनी गमावला जीव? WHOच्या दाव्याने खळबळ

खोकल्याच्या औषधामुळे 66 मुलांनी गमावला जीव? WHOच्या दाव्याने खळबळ

आफ्रिका खंडातील गांबिया या देशामध्ये अशी घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

आफ्रिका खंडातील गांबिया या देशामध्ये अशी घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

आफ्रिका खंडातील गांबिया या देशामध्ये अशी घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली: सर्दी-खोकला ही लहान मुलांमध्ये दिसणारी सामान्य समस्या आहे. बहुतेक लहान मुलांना वारंवार सर्दी-खोकला होत असल्याचं तुम्ही बघितलं असेल. परिणामी, अशा मुलांचे पालक घरामध्ये एखादं कफ सिरप कायम ठेवतात. मात्र, हेच कफ सिरप जीवघेणं ठरलं तर?

आफ्रिका खंडातील गांबिया या देशामध्ये अशी घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. पश्चिम आफ्रिका खंडात असलेल्या गांबियात एका भारतीय औषध कंपनीने बनवलेलं कंजेस्टंट आणि कफ सिरप प्यायल्यानं 66 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) केला आहे. याशिवाय हे सिरप न वापरण्याचा इशाराही संघटनेनं दिला आहे. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं (WHO) बुधवारी (5 ऑक्टोबर) 'मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेड' या कंपनीने तयार केलेल्या चार कफ सिरपबाबत अलर्ट जारी केला आहे. एक मेडिकल प्रॉडक्ट अलर्ट जारी करताना डब्ल्युएचओनं सांगितलं की, 'चारही कफ सिरपच्या प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचं अस्वीकार्य प्रमाण आढळलं आहे.

Food To Increase Platelet Count : हे पदार्थ खाल्ल्यानंतर काही तासांतच वाढतील प्लेटलेट्स; डेंग्यूपासून लगेच होईल सुटका

हा प्रकार आतापर्यंत फक्त गांबियामध्ये निदर्शनास आला आहे. अशीच औषधं इतर देशांमध्येही वितरित केली गेल्याची शक्यता आहे. सध्या आरोग्य संघटना ही कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत मिळून याची चौकशी करत आहे.'

अहवालानुसार, दूषित उत्पादनांमध्ये प्रोमिथायजिन ओरल सोल्युशन (Promethazine Oral Solution), कोफेक्समेलिन बेबी कफ सिरप (Kofexmalin Baby Cough Syrup), मेकॉफ बेबी कफ सिरप (Makoff Baby Cough Syrup) आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरप (Magrip N Cold Syrup) यांचा समावेश आहे.

डब्ल्युएचओनं आपल्या अलर्टमध्ये म्हटलं आहे की, हे सर्दी-खोकला सिरप गांबियामध्ये झालेले 66 मृत्यू आणि निर्माण झालेल्या गंभीर मूत्रपिंड समस्यांसाठी जबाबदार असू शकतं. रिपोर्टनुसार, या सिरपमध्ये डाएथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलचं अस्वीकार्य प्रमाण असल्याची खात्री झाली आहे.

तुम्ही प्लास्टिकचा भात तर खात नाही ना? 'या' ट्रीकने ओळखा तांदूळ बनावट की खरा

जे मानवासाठी अत्यंत धोकादायक आहे. विशेषत: ही औषधं लहान मुलांसाठी अत्यंत घातक ठरू शकतात. यामुळे ते घेणाऱ्या व्यक्तीला गंभीर दुखापत होऊ शकते. त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अशी कोणतीही औषधं वापरू नयेत.

डब्ल्युएचओनं केलेल्या दाव्यामुळे भारतीय औषध निर्मिती उद्योगात खळबळ उडाली आहे. दिल्लीतील महत्त्वाच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशननं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.

First published: