मॅसेच्युसेट्स, 06 ऑक्टोबर : मूळचे बल्गेरियातील असलेल्या बाबा वेंगाच्या भविष्यवाणींची अनेकदा चर्चा होते. आतापर्यंत त्यांनी केलेली अनेक भाकितं खरी ठरली आहेत. हे बाबा वेंगा सध्या हयात नाहीत. मात्र, आता त्यांचा उत्तराधिकारी जगाला मिळाला असल्याची चर्चा आहे. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स येथे जन्मलेल्या हॅना कॅरोल नावाच्या मुलीला ‘लेडी बाबा वेंगा’ म्हटलं जात आहे. अचूक भाकितामुळे 19 वर्षांची हॅना चर्चेत आली आहे. तिने 2022 मध्ये 28 मोठी भाकितं केली होती. त्यापैकी आतापर्यंत 10 खरी ठरली आहेत. त्यामुळे तिला नव्या युगातील बाबा वेंगा मानलं जात आहे. हॅना कॅरोलची ही भाकितं झाली आहे खरी हॅना कॅरोलनं 2022 या वर्षाच्या सुरुवातीला ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्युची भविष्यवाणी केली होती. जी एकदम खरी ठरली आहे. जानेवारी महिन्यामध्ये हॅनानं केलेल्या भाकितांमध्ये किम कार्दशियनचं ब्रेकअप, हॅरी स्टाइल्स आणि बियॉन्सेचा नवीन अल्बम, रिहाना आणि प्रियांका चोप्रा यांच्या आई होण्याचा घटनांचा समावेश होता. आतापर्यंत ही सर्व भाकितं खरी ठरली आहेत. (ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं वार्षिक उत्पन्न किती? हा निधी नेमका येतो कुठून?) हॅनाच्या या भाकितांकडे आहे जगाचे लक्ष डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार, 19 वर्षांच्या हॅना कॅरोलचे बहुतेक अंदाज पॉप कल्चर किंवा सिनेमा इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. त्याकडे आता अनेकांचं लक्ष लागलं आहे. यामध्ये केंडल जेनरची एंगेजमेंट, हेली बीबरची प्रेग्नन्सी, टायलर स्विफ्टची लग्न किंवा एंग्जेमेंटची घोषणा, वन डायरेक्शन बँडचं रियुनियन यांचा समावेश आहे. तिची ही भाकितं खरी ठरतील की नाही, याबाबत उत्सुकता आहे. हॅना ठरत आहे नव्या युगातील बाबा वेंगा बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांनी 20 व्या शतकात अनेक भाकितं केली होती. त्यांची अनेक भाकितं खरी ठरली आहेत. त्यांच्या प्रमाणेच हॅनाचीही भाकितं खरी ठरत आहेत. त्यामुळे लोक हॅना कॅरोलला 21व्या शतकातील बावा वेंगा म्हणून संबोधत आहेत. हॅना म्हणते की, तिला पॉप कल्चर आणि सेलेब्समध्ये जास्त रस आहे. म्हणूनच तिचे बहुतेक अंदाज त्यांच्याबद्दल असतात. जर यंदा तिची भाकितं खरी ठरली नाहीत, तर येत्या काही वर्षांत ती नक्कीच खरी ठरतील, असंही ती म्हणते. (युनियन जॅक उतरला, पण क्वीन एलिझाबेथ अजूनही या 15 देशांच्या ‘सम्राज्ञी’) भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्याबाबत बहुतेकांच्या मनात उत्सुकता असते. त्यामुळे हॅनासारख्या भाकितं करणाऱ्या व्यक्तींबद्दल लोकांना नेहमीच कुतूहल वाटत आलं आहे. अशा व्यक्तींची भाकितं खरी ठरली, की लोकांना त्यांच्यावरील विश्वासही वाढतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.