मराठी बातम्या /बातम्या /Viral /

या चित्रात तुम्हाला किती घोडे दिसतात? संख्येवरून कळेल तुमचा स्वभाव, लगेच पाहा

या चित्रात तुम्हाला किती घोडे दिसतात? संख्येवरून कळेल तुमचा स्वभाव, लगेच पाहा

या फोटोमध्ये कित्येक घोडे (Optical illusion horses painting) आहेत. मात्र, काही व्यक्तींना यात केवळ एकच मोठा घोडा दिसेल. तर, काही व्यक्तींना यात पाच ते दहा घोडे दिसतील.

या फोटोमध्ये कित्येक घोडे (Optical illusion horses painting) आहेत. मात्र, काही व्यक्तींना यात केवळ एकच मोठा घोडा दिसेल. तर, काही व्यक्तींना यात पाच ते दहा घोडे दिसतील.

या फोटोमध्ये कित्येक घोडे (Optical illusion horses painting) आहेत. मात्र, काही व्यक्तींना यात केवळ एकच मोठा घोडा दिसेल. तर, काही व्यक्तींना यात पाच ते दहा घोडे दिसतील.

नवी दिल्ली 13 मे : तुम्हाला ऑप्टिकल इल्युजन (Optical illusion) म्हणजे काय माहिती आहे? ही अशा प्रकारची चित्रं किंवा फोटो असतात, जी पहिल्यांदा पाहिल्यानंतर साधी वाटतात. मात्र, अगदी लक्षपूर्वक पाहिलं तर त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी दडलेल्या दिसतात. काही वेळा यामध्ये अक्षरं किंवा आकडे लपलेले असतात. डोळ्यांच्या तपासणीवेळी किंवा कलर ब्लाईंडनेस (Colour Blindness test) ओळखण्यासाठी अशा प्रकारच्या ऑप्टिकल इल्यूजन्सचा वापर केला जातो. तर, काही फोटोंमध्ये विविध प्राणी, झाडे किंवा व्यक्ती एकमेकांत मिसळलेल्या असतात.

काही ऑप्टिकल इल्यूजन्स तर सरळ असताना वेगळी दिसतात आणि उलटी फिरवल्यानंतर वेगळेच चित्र दिसते. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? ही ऑप्टिकल इल्यूजन्स तुमचं व्यक्तिमत्व (Optical illusions and personality) देखील सांगू शकतात. विश्वास नाही बसत ना? पण ते खरंय!

चला पाहूया किती तीक्ष्ण आहे तुमची नजर! शोधून काढा या PHOTO मध्ये दडलेले शब्द

ऑप्टिकल इल्यूजन्स हे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे दिसतात. कारण प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो. उदाहरण द्यायचं झाल्यास, हा घोड्यांचा फोटो पाहा. या फोटोमध्ये कित्येक घोडे (Optical illusion horses painting) आहेत. मात्र, काही व्यक्तींना यात केवळ एकच मोठा घोडा दिसेल. तर, काही व्यक्तींना यात पाच ते दहा घोडे दिसतील. काहींना तर अगदी 12 घोडेदेखील मोजता येतील. तुम्हाला या फोटोमध्ये किती घोडे दिसतात (How many horses can you spot) यावरूनच तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज (Personality test) बांधता येतो. टाइम्स नाऊने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

माईंड्स जनरलने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला या फोटोमध्ये एकच घोडा दिसत असेल, तर तुम्ही गोष्टींचा जास्त खोलवर विचार करत नाही. तसेच, तुम्ही महत्त्वाचे निर्णयही अगदी घाईघाईमध्ये घेता. अर्थात तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत भरपूर विचार करत नसला, तरी त्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी व्यापक आहे.

Wow! फक्त Burger-Sandwitch खाण्यासाठी महिन्याला 94 हजार रुपये पगार; कुठे आहे हा Dream Job पाहा

याच्या अगदी उलट, जर तुम्हाला 11 पेक्षा अधिक घोडे (Horses picture and personality) दिसले, तर नक्कीच तुमची नजर अगदी शार्प आहे. इतरांच्या चटकन लक्षात न येणारी गोष्टही तुमच्या बरोबर लक्षात येते. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात आणि लोकांना तुमच्यासोबत काम करायला आवडते. मात्र, तुमच्या स्वभावामुळे तुम्ही नेहमी अशा परिस्थितीत अडकता जिथे तुम्हाला स्वतःलाच पुढे जावं की थांबावं याबाबत साशंकता निर्माण होते. स्वतःच्या कामगिरीवरही तुम्ही कधी समाधानी नसता. तुम्हाला स्वतःकडून आणि इतरांकडून भरपूर अपेक्षा असतात.

बहुतांश लोकांना यामध्ये (Viral optical illusion) पाच ते 10 घोडे दिसतात. जर तुम्हीही त्यांपैकी एक असाल, तर एक परफेक्शनिस्ट असण्याचे सर्व गुण तुमच्यात आहेत. तुम्ही कोणतीही गोष्ट हलक्यात घेत नाही, आणि ज्या गोष्टींना महत्व द्यायला हवे त्यांना तुम्ही बरोबर देता. तुमचा समंजसपणा आणि तर्कशुद्ध विचारपद्धती तुमची निर्णयक्षमता चांगली बनवतो. मात्र, तुमची काम करण्याची पद्धती अव्यवस्थित आहे. अर्थात, त्यामुळे कामाच्या परिणामावर फारसा प्रभाव पडत नाही. तुमचे ध्येय साधण्यात तुम्ही बरोबर यशस्वी होता.

तर मग तुम्हाला या फोटोमध्ये किती घोडे दिसले? तुमचाही स्वभाव तुम्हाला दिसलेल्या घोड्यांच्या संख्येनुसारच आहे ना? चीटिंग न करता, खरं खरं सांगा!

First published:

Tags: Other animal