मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Wow! फक्त Burger-Sandwitch खाण्यासाठी महिन्याला 94 हजार रुपये पगार; कुठे आहे हा Dream Job पाहा

Wow! फक्त Burger-Sandwitch खाण्यासाठी महिन्याला 94 हजार रुपये पगार; कुठे आहे हा Dream Job पाहा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

घरबसल्याच तुम्हाला फास्ट फूड खायचं आहे आणि त्यासाठी ही कंपनी तुम्हाला पगार देणार आहे.

  • Published by:  Priya Lad

लंडन, 06 मे : खायला कुणाला आवडत नाही. बर्गर-सँडवीच असे पदार्थ तर कित्येकांचे फेव्हरेट आहेत. पण खाद्यपदार्थ खाण्यासाठी एरवी आपण पैसे देऊन ते खातो पण तुम्हाला कुणी हे असे पदार्थ खाण्यासाठी पैसे देत असेल तर...(Job for eating food) म्हणजे बर्गर-सँडवीच खाण्याचीच नोकरी असेल आणि त्यासाठी तुम्हाला महिन्याला पगार मिळणार असेल तर... काय! अशी नोकरीही असू शकते का? असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण एका कंपनीने हा ड्रिम जॉब ऑफर केला आहे (Dream Job of Food Tester).

तुम्हाला ऑफिसला जाण्याची गरज नाही. घरी बसूनच तुम्हाला चविष्ट पदार्थ खायचे आहेत आणि यासाठी तुम्हाला मासिक 94 हजार रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी काही विशेष पात्रतेचेही गरज नाही. उमेदवाराचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावं इतकंच. त्यामुळे तुम्ही खवय्ये असाल, त्यातही तुम्हाला फास्ट फूड खायला आवडत असेल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

हे वाचा - क्या बात है! नोकरीसोबत 'छोकरा-छोकरी'ही देते ही भारतीय कंपनी; लग्न करताच वाढते Salary

नोकरीत निवड करण्यासाठी उमेदवाराला एका एक्सपरिमेंटमध्ये सहभागी व्हावं लागेल. त्यांना पूर्ण देशातून निवडण्यात आलेल्या 20 लोकप्रिय फास्ट फूड मील्सचे सॅम्पल्स खावे लागतील. ते लंच किंवा डिनर काहीही म्हणून खाऊ शकता.  यात मॅकडोनाल्ड्स (McDonald’s), सबवे (Subway), ग्रेग्स (Greggs) अशा प्रसिद्ध मील पॅक्सचा समावेश असेल.

ही नोकरी करणाऱ्या व्यक्तीला आपल्यासोबत एक डायरी ठेवावी लागेल. त्यांनी खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर तो कसा वाटला ते  त्या डायरीत लिहून ठेवायचं आहे. ज्यात सर्वकाही सविस्तर लिहायचं आहे. याला ते भूक भागणं, एनर्जी, प्रोडक्टिव्हिटी, समाधान यानुसार रेटिंग करतील. खाल्ल्यानंतर एक-दोन तासांच त्यांना आपला अनुभव मांडावा लागेल.  नोकरीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तो आपला रिपोर्ट मार्केटप्लेसला देईल ज्यावर न्यूट्रिशनिस्ट काम करतील.

हे वाचा - कसं शक्य आहे? ना डाएट, ना एक्सरसाईझ; तरी फक्त 2 दिवसांतच याने बनवले 6 Pack abs

आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही नोकरीची ऑफर आहे कुठे. मिररच्या रिपोर्टनुसार  यूकेतील MaterialsMarket.com ने ही नोकरी उपलब्ध करून दिली आहे. Takeaway Testers या पदासाठी ही नोकरी आहे. यासाठी फक्त 6 लोकांची निवड केली जाणार आहे. ही नोकरी फक्त एका महिन्यासाठी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2022 आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

First published:

Tags: Career, Food, Job, Lifestyle