जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रेल्वे कर्मचारी स्वत:च्या कारने ड्युटीवर आल्याने वरिष्ठांकडून नोटीस, रेल्वेचा नियम काय आहे?

रेल्वे कर्मचारी स्वत:च्या कारने ड्युटीवर आल्याने वरिष्ठांकडून नोटीस, रेल्वेचा नियम काय आहे?

Indian Railways: महाराष्ट्रातून धावणाऱ्या ‘या’ दोन ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, प्रवासापूर्वी वाचा डिटेल्स

Indian Railways: महाराष्ट्रातून धावणाऱ्या ‘या’ दोन ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, प्रवासापूर्वी वाचा डिटेल्स

Indian Railway Rule: रेल्वेच्या वरिष्ठ सेक्शन ऑफिसरने जारी केलेल्या नोटीसमध्ये कारने ड्युटीवर येणे हे रेल्वे प्रोटोकॉलचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

  • -MIN READ Viralimalai,Pudukkottai,Tamil Nadu
  • Last Updated :

मुंबई, 3 ऑगस्ट : भारतीय रेल्वेचं जाळं आज देशभर पसरलं आहे. इंग्रजांच्या काळात सुरु झालेल्या रेल्वे आतापर्यंत खुप मोठा पल्ला गाठला आहे. भारतीय रेल्वेने प्रवासी सुविधांच्या बाबतीतही बरीच प्रगती केली आहे. यानंतरही रेल्वेचे काही नियम मात्र ब्रिटीश काळाची आठवण करून देतात. काही दिवसांपूर्वीच भारतीय रेल्वेच्या हापूर येथील विभागात तैनात असलेल्या एका गेटमनला कारने ड्युटीवर आल्याबद्दल नोटीस देण्यात आली आहे. हापूर विभागात तैनात असलेला हा गेटमन आपल्या कारमध्ये ड्युटीवर आला होता आणि त्याने गाडी जवळच पार्क केली होती. हापूर विभागाचे वरिष्ठ विभाग अभियंता तपासणीसाठी बाहेर गेले असता त्यांना तेथे कार पार्क केलेली दिसली. चौकशी केली असता गाडी गेटमनची असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर गेटमनला लेखी नोटीस देण्यात आली. एक छोटीशी चूक आणि पेट्रोल पंपवर गाडीने घेतला पेट; धडकी भरवणारा VIDEO

News18

रेल्वेच्या वरिष्ठ सेक्शन ऑफिसरने जारी केलेल्या नोटीसमध्ये कारने ड्युटीवर येणे हे रेल्वे प्रोटोकॉलचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. रेल्वेच्या वरिष्ठ विभाग अभियंत्याने नोटीस बजावली की, गाडीने ड्युटीवर येणे हे रेल्वे प्रोटोकॉलचे उल्लंघन आणि कर्तव्यात निष्काळजीपणा दर्शवते. गेट मॅनचे ड्युटीवर गाडीने येणे हे रेल्वे प्रशासन कायदा, 1968 च्या परिच्छेद क्रमांक 3 मधील कलम (I) (II) (III) चे उल्लंघन आहे. रेल्वे विभागात शिपाई, गेटमन, ट्रॅकमन या कर्मचाऱ्यांना ग्रुप डी कर्मचारी म्हणतात. रेल्वेच्या अशा ग्रुप डी कर्मचाऱ्यांना गाडीने ड्युटीवर येण्याची परवानगी नाही. मालकाने नोकरीवरून काढताच कर्मचाऱ्याने घेतला खतरनाक बदला; VIDEO VIRAL एखादी व्यक्ती आपल्या गाडीतून ड्युटीवर आली की इतर कोणत्याही मार्गाने आली तरी फरक पडत नाही. महत्त्वाचं म्हणजे तो वेळेवर ड्युटीवर येतो आणि त्याचं काम करतो. यावेळी रेल्वेतील गट ड कर्मचाऱ्यांच्या नोकरीसाठी एम.टेक, बी. टेक आणि पदवीधर लोक येत आहेत.  कदाचित त्या गेटमनची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. रात्रीच्या वेळी सुरक्षित कर्तव्याच्या ठिकाणी पोहोचणे देखील आवश्यक आहे. रेल्वे एम्प्लॉइज युनियन उत्तर रेल्वे मजदूर युनियनने ही नोटीस चुकीची असल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात