रोम, 03 ऑगस्ट : अनेकदा आपण नकळत अशा काही चुका करतो ज्यामुळे भयंकर दुर्घटना घडते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. कारचालकाने एक छोटीशी चूक केली आणि कारने पेट घेतला. पेट्रोलपंपावर घडलेली ही भयंकर दुर्घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ धक्कादायक आहे. व्हिडीओत पाहूत शकता पेट्रोल पंपावर एक कार उभी आहे. कारमध्ये पेट्रोल भरलं जात आहे. कारचा मालका कारला टेकूनच कारबाहेर उभा आहे. तो खिशातून काहीतरी काढतो आणि त्याचवेळी त्याची कार पेट घेते. कारला आग लागते आणि पेट्रोलपंपवरील मशीनलाही. त्यानंतर ती व्यक्ती घाबरते आणि घाईघाईत फ्यूल पंपचं हँडल आपल्या गाडीतून काढून फेकते. तेव्हा आगीचा आणखी भडका उडतो. ती व्यक्ती गाडीत बसते आणि कार घेऊन तिथून पळून जाते. गाडीच्या मागच्या बाजूने पेट घेतल्याचं दिसतं. त्यानंतर तिथं असलेले सर्व लोक घाबरतात. सर्वजण आपाआपल्या गाड्या घेऊन तिथून निघतात. हे वाचा - मालकाने नोकरीवरून काढताच कर्मचाऱ्याने घेतला खतरनाक बदला; VIDEO VIRAL पेट्रोपपंप धुराचे लोट पसरतात. थोडी आग कमी झाल्यानंतर ती व्यक्ती तिथं पुन्हा येते आणि तिथं असलेलं Fire Extinguisher उचलून, उघडते आणि त्याचा मदतीने आग पूर्णपणे विझवते. यामुळे एक मोठी दुर्घटना टळते.
A man in #Chelyabinsk region, #Russia decided to light a cigarette at a petrol station. The result of this can be seen in the video. pic.twitter.com/PaVS5cuU8P
— NEXTA (@nexta_tv) July 30, 2022
व्हिडीओ तुम्ही नीट पाहिला तर त्या व्यक्तीच्या हातात एक लाइटर आहे. लाइटर पेटवून तो सिगारेट पेटवायला जातो आणि सिगारेटऐवजी त्याच्या कारलाच आग लागते. हे वाचा - Fact Check : गाडीवर लिंबू-मिरची लावल्यावर 5 हजाराचा दंड? अखेर सत्य आलं समोर Nexta ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. त्यामुळे तुम्ही अशी चूक बिलकुल करू नका. या व्यक्तीचं नशीब चांगलं होतं म्हणून तो बचावला आणि जीवितहानी होईल अशी मोठी दुर्घटना घडली नाही. पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही. त्यामुळे आपणच काळजी घ्यायला हवी.

)







