जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - फक्त 10 फुगे फुगवले पण शरीराच्या अशा भागातून भरली हवा की झाला World Record

VIDEO - फक्त 10 फुगे फुगवले पण शरीराच्या अशा भागातून भरली हवा की झाला World Record

फुगे फुगवण्याचा असा केला वर्ल्ड रेकॉर्ड

फुगे फुगवण्याचा असा केला वर्ल्ड रेकॉर्ड

व्यक्तीने तोंड किंवा पम्पाऐवजी अशा पद्धतीने फुगे फुगवले की त्याची गिनीज बुकमध्ये नोंद झाली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 26 ऑगस्ट : बर्थडे किंवा इतर कोणत्या पार्टीसाठी तुम्ही फुगे फुगवलेच असतील. यावेळी कोण सर्वात जास्त फुगे फुगवतं अशी स्पर्धाही तुम्ही लावली असेल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका व्यक्तीने एकाच वेळी फक्त 10 फुगे फुगवले आणि त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही यापेक्षा जास्त फुगे फुगवू शकता मग हा वर्ल्ड रेकॉर्ड कसा होईल. तर व्यक्तीच्या फुगे फुगवण्याच्या पद्धतीमुळे हा रेकॉर्ड झाला आहे. त्याने शरीराच्या अशा भागातून फुग्यात हवा भरली की गिनीज बुकमध्ये त्याची नोंद झाली. सामान्यपणे आपण फुगे तोंडाने फुगवतो पण अमेरिकेच्या इडाहोमध्ये राहणारा डेव्हिड रश असे फुगे फुगवतो जे फक्त तुम्ही वाचूनच तुम्ही हैराण व्हाल. डेव्हिड चक्क नाकाने फुगे फुगवतो. रिपोर्टनुसार डेव्हिडने पाच वर्षांपूर्वी नाकाने फुगे फुगवून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला होता. पण सर्दी आणि अॅलर्जीमुळे त्याला ते शक्य झालं नाही. पण आता त्याने पुन्हा प्रयत्न केला आणि ६० सेकंदात म्हणजे एका मिनिटांत १० फुगे नाकातील हवेने फुगवले आणि ते हातांनी बांधलेसुद्धा. हे वाचा -  VIDEO - डोक्याजवळ बंदूक ठेवून कॅमेऱ्यासमोर देत होती पोझ; अचानक सुटली गोळी… पुढे जे घडलं ते सुन्न करणारं याआधी 2016 साली हा रेकॉर्ड  एशरिटा फरमॅनच्या नावे आहे. ज्याने एका मिनिटात 9 फुगे नाकाने फुगवले होते. डेव्हिडने याच वेळेत एक जास्त फुगा फुगवून हा रेकॉर्ड आता आपल्या नावे केला.

डेव्हिडकडे हे एकच टॅलेंट नाही. तर त्याने याआधीही असे काही वेगवेगळे रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. हे वाचा -  इंटरनेटवर का होतेय Dosa Printer ची चर्चा, खरंच पेपर प्रमाणे प्रिंटरमधून डोसा येणार? पाहा व्हिडीओ भारतात तामिळनाडूतील सलेमकडेही असंच अनोखं टॅलेंट आहे. जो आपल्या नाकाने लॉरी ट्युबमध्ये हवा भरतो. ९ मिनिटं ४५ सेकंदात ३ लॉरी ट्युबमध्ये हवा भरण्याचं करतब त्याने दाखवलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात