मुंबई, 24 ऑगस्ट : सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी, नेटिझन्सचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी लोक काय काय नाही करत. मग तो विचित्र डान्स असो, बेसूर गाणं असो किंवा अगदी जीवघेणा स्टंट. या नादात किती तरी जण आपला जीव धोक्यात टाकतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक तरुणी चक्क बंदुकीसह आपला व्हिडीओ बनवत होती. त्याचवेळी अचानक त्या बंदुकीतून गोळी सुटली. पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे. तरुणीने आपल्या हातात बंदूक धरली आहे. ही खरी बंदूक आहे. बंदूक ती आपल्या डोक्याजवळ नेते आणि उभी धरते. त्याचवेळी ती ट्रिगर दाबते. तेव्हा अचानक त्यातून गोळी सुटते. तरुणीच्या डोक्याजवळच ही बंदूक बाहेर पडते. व्हिडीओ पाहून आपल्याही अंगावर काटा येतो. गोळी तरुणाच्या डोक्यात घुसली की काय असंच क्षणभर वाटतं. हे वाचा - बंदुकीत टूथब्रश टाकून दात घासायला गेला, ट्रिगर दाबताच…; नको तो जुगाड करताना काय घडलं Watch Video व्हिडीओत जशी बंदुकीतून गोळी बाहेर येते तसा आवाज येतो आणि ती तरुणीही घाबरते. ती पटकन खाली वाकते. नंतर ती उठून सर्वत्र बघते. तेव्हा कुठे तिच्या जिवात जीव येतो. आपण जिवंत आहोत यावर कदाचित तिलाही विश्वास बसत नाही आहे. ती जिवंत राहिली कारण बंदूक उभी होती आणि जेव्हा तिने ट्रिगर दाबली तेव्हा गोळी तिच्या केसांमधून डोक्याला स्पर्श करून वरच्या दिशेने गेली आणि ती छताला लागली. जरा जरी बंदूक आडवी असती तर हीच गोळी तिच्या डोक्यात घुसली असती आणि तिचा जीवही गेला असता. पण सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
This gender and danger, will be the end of us. Imagine if.....🤔😳😳🙆🏽♂️🙆🏽♂️ pic.twitter.com/MR8hje0YEY
— Salt & Pepper😊🇿🇦 (@D_Bhekza) August 23, 2022
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि कधीचा आहे हे माहिती नाही. पण @D_Bhekza ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून सर्वांना धडकी भरली आहे. हे वाचा - Viral video : प्रसिद्धीसाठी Reels काढणाऱ्या तरुणाची एक चूक, त्याला भलतीच महागात पडली तुम्हाला असे खतरनाक स्टंट करण्याची हौस असेल किंवा तुमच्या ओळखीतील एखादी व्यक्ती अशी स्टंट करत असेल तर त्यांना ही बातमी नक्की शेअर करा आणि त्यांना सावध करा.