पीपीई सूट घालून एअरपोर्टवरच नाचू लागली युजवेंद्र चहलची होणारी बायको; धनश्रीचा VIDEO VIRAL

पीपीई सूट घालून एअरपोर्टवरच नाचू लागली युजवेंद्र चहलची होणारी बायको; धनश्रीचा VIDEO VIRAL

पीपीई सूट घालून 'कुर्ता-पजामा'वर युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) होणारी बायको धनश्री वर्माचा (dhanashree verma) हा डान्स सर्वांनाच आवडला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) साखरपुडा केल्यानंतर त्याची होणारी बायको धनश्री वर्माचे (dhanashree verma) बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) झाले. धनश्री कोरिओग्राफर आहे. चहलसह साखरपुडा झाल्यानंतर ती अधिकच चर्चेत आली. तिचे डान्सचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. दरम्यान धनश्रीने नुकत्याच केलेल्या एका डान्सचा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. ज्यामध्ये धनश्री पीपीई सूट घालून एअरपोर्टवरच नाचू लागली आहे.

धनश्री आपल्या सोशल मीडियावर आपले डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. आता शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती एका पंजाबी गाण्यावर डान्स करते आहे. पीपीई सूट घालून तिनं कुर्ता पजामा या पंजाबी गाण्यावर ठेका धरला आहे. धनश्रीने एअरपोर्टवरच हा डान्स केला आहे. विमानतळाच्या वेटिंग लाऊंजमध्ये तिनं आपल्या डान्सचा व्हिडीओ शूट केला आहे.

धनश्री वर्मा एक यूट्यूबर असून डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. तिची स्वत:ची कंपनीही आहे. धनश्री वर्मा नावाची तिची स्वत:ची कंपनीही आहे. धनश्री वर्मा बॉलिवूड गाण्यांवर डान्स करते. याशिवाय तिने हिपहॉपचं प्रशिक्षणही घेतलं आहे. तिच्या यूट्यूब चॅनलला 1.5 मिलिअन सबस्क्रायबर आहे. आपल्या चॅनेलवर तिने असे बरेच व्हिडीओ याआधी शेअर केले आहेत.

हे वाचा - प्रसिद्ध वेटलिफ्टरनं उचललं 400 किलोचं वजन,एका सेकंदात अशी झाली गुडघ्यांची अवस्था

युजवेंद्र चहलने 8  ऑगस्टला आपल्या सोशल मीडियावर धनश्रीसह साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. कोरोना काळात झालेल्या या छोटेखानी सोहळ्यात या दाम्पत्याचे कुटुंबीय उपस्थित होते.

Published by: Priya Lad
First published: August 13, 2020, 5:54 PM IST

ताज्या बातम्या