मुंबई, 14 ऑगस्ट : अनेक पक्षी प्रेमी अन्न घराबाहेर धान्य आणि पाणी पक्ष्यांसाठी खायला ठेवतात. काहीवेळा भुकेलेले पक्षी किंवा प्राणी काही खायला मिळालं नाही की घरात घुसून खायचं धाडस करतात. सीगल नावाच्या पक्ष्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा सीगल नावाचा पक्षी दबक्या पावलानं दुकानात घुसला आणि त्यानं भुक लागल्यानं चिप्सचं पाकिट घेऊन पळ काढला. सीगलची चोरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला नेटकऱ्यांनी तुफान पसंती दिली आहे.
IFS, भाई साहब, कुछ काम भी कर लिया करो। हम आपको पैसे फोटो डालने के नहीं देते। कभी जो काम करते हो उसकी फोटो भी दाल दिया करो। की फ्री की पे खा रहे हो।
— Ram (@vipankpatial) August 9, 2020
हे वाचा- 6 दिवसांच्या बाळाला आयानं खेळण्यासारखं फेकलं, धक्कादायक CCTV VIDEO आला समोर या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता सीगल अगदी दबक्या पावलांनी दुकानात घुसला. त्यानं चोचीत पाकिट पकडलं आणि कुणी पाहात नाही ना याचा कानोसा घेत भुर्रर्र झाला. हा सीगल पक्षी एक अनुभवी शॉपलिफ्टर असल्याचं एका युझरनं कमेंटमध्ये म्हटलं आहे. IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ 5.6 मिलियन युझर्सनी पाहिला असून 4 लाखहून अधिक लोकांनी लाइक आणि रिट्वीट केला आहे. सोशल मीडियावर सीगलचा हा चोरीचा मजेरीश व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.