नवी दिल्ली, 21 मे : बाळाचं पहिलं पाऊल प्रत्येक पालकांसाठी आणि त्या बाळाच्या कुटुंबासाठी स्पेशल असतं. बाळाने पहिलं पाऊल टाकताच त्याचा आनंद सर्वांना होतो. पण सध्या एका बाळाचं पहिलं पाऊल संपूर्ण जगासाठी स्पेशल ठरलं आहे. बाळाने पहिलं पाऊल टाकताच असं काही घडलं, ज्याचा विचारही कुणी केला नसेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. बाळ सुरुवातीला पोटावर, नंतर गुडघ्यावर रांगतं. हळूहळू ते उभं राहतं आणि एकेएक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतं. सुरुवातीला त्याचा तोल जातो आणि काही पावलातच ते धपकन पडतं. पण पुन्हा उठतं आणि स्वतःच चालण्याचा प्रयत्न करतं. असंच चालण्याचा प्रयत्न करणारं हे बाळ. ज्याने पहिलं पाऊल टाकलं. त्यानंतर त्याने जे केलं ते मात्र आश्चर्यकारक आहे. मुलाच्या आईवडिलांनी त्याचा पहिल्या पावलाचा क्षण कॅमेऱ्यात कैद करायला घेतलं. पण प्रत्यक्षात असं काही रेकॉर्ड होईल, असं त्यांनाही कधीच वाटलं नव्हतं. बाळाला जन्म दिल्याने 31 वर्षीय महिलेला तुरुंगवास; काय आहे हे अजब प्रकरण? व्हिडीओत तुम्ही पाहू शकता लहान बाळ दिसतं आहे ते उभं राहिलं आहे. सुरुवातीला त्याने आपल्या भावाचा हात धरला आहे. पण नंतर तो हात सोडतो आणि स्वतःच पुढे चालत जायला बघतो. दोन पावलं टाकल्यानंतर तो एका ठिकाणी स्तब्ध राहतो आणि चक्क नाचू लागतो. कदाचित पहिलं पाऊल टाकल्याचा आनंद त्याला झाला आणि तोच आनंद तो नाचून व्यक्त करताना दिसत आहे. त्याचं हे कृत्य पाहून सर्वांना हसू आलं. या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहता पाहता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्याने सर्वांचं मन जिंकलं आहे. त्याच्या या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. बाबो! हे असं कसं बाळ? चिमुकल्याचे हातपाय पाहून डॉक्टरही शॉक; पाहा PHOTO एका युझरने जर तो नर्तक झाला तर आपण चालण्याऐवजी नाचायलाच शिकलो, असं सांगेल, अशी कमेंट केली तर एकाने हा अमेरिका गॉट टॅलेंटमध्ये नक्कीच येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
तुम्हाला या बाळाचा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.