तिरुवनंतपुरम, 08 फेब्रुवारी : काही दिवसांपूर्वी प्रेग्नंट पुरुषाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ट्रान्सकपलने आपल्याकडे गूड न्यूज येणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि ती वाऱ्यासारखी पसरली. याच कपलने आता आणखी एक पोस्ट शेअर करत त्यांचं बाळ जन्माला आल्याची माहिती दिली आहे. देशातील पहिला प्रेग्नंट पुरुषाची डिलीव्हरी झाली आहे. केरळच्या कोझिकडमधील जाहद आणि जिया पावल एक ट्रान्सजेंडर कपल आहे. जिया पुरुष म्हणून तर जाहद महिला म्हणून जन्माला आला. पण आता लिंगबदल शस्त्रक्रिया करून जिया महिला आणि जाहद पुरुष बनला आहे. जिया आणि जाहाद हे दोघेही गेल्या 3 वर्षांपासून एकत्र राहतात. जियाने याआधी शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं होतं की, मी जन्माने किंवा शरीराने महिला नव्हते, माझ्यात एक स्त्री होती. तिचं स्वप्न होतं की माझंही एक बाळ असावं आणि ते मला आई म्हणावं. हे वाचा - Trans couple pregnany : ‘तो’ आई होणार पण…! बाळाला जन्म दिल्यानंतर पुरुष त्याला दूध कसं पाजणार? ट्रान्सजेंडर कपलने एका बाळाला दत्तक घेण्याची तयारी केली होती. याबाबत त्यांनी पूर्ण प्रक्रिया जाणून घेतली होती. पण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचं त्यांच्यासमोर आव्हान होतं. ट्रान्सजेंडर कपल असल्यानं दोघांनाही ते अडचणीचं ठरल्याने अखेर त्यांनी निर्णय बदलला. जाहदने प्रेग्नन्सीसाठी आपली ट्रान्समेन बनण्याची शस्त्रक्रिया थांबवली. शरीरातील गर्भाशय आणि इतर अवयव तसेच ठेवले, त्यामुळे गर्भधारणेत यश आलं आणि तो प्रेग्नंट झाला.
8 फेब्रुवारी 2023 रोजी जाहादची डिलीव्हरी झाली त्याने एका बाळाला जन्म दिला आहे. जियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही गूड न्यूज दिली आहे. तिने त्यांच्या बाळाचा पहिला फोटोही शेअर केला आहे. हे वाचा - प्रेग्नन्ट न होता बाळाला जन्म देणं, हे खरंच शक्य आहे का? पाहा क्रिप्टीक प्रेग्नन्सी म्हणजे काय सकाळी 9 वाजून 37 मिनिटांनी बाळाचा जन्म झाला. त्याचं वजन 2.92 किलो आहे. अशी माहिती जियाने दिली आहे. तसंच तिने तिला साथ देणाऱ्या सर्वांचे आभारही मानले आहेत.
जाहद हा भारतात बाळाला जन्म देणारा पहिला ट्रान्समेन असल्याचं सांगितलं जातं आहे. सर्जरीवेळी जाहदने दोन्ही ब्रेस्ट काढून टाकले आहेत. त्यामुळे बाळाला ब्रेस्ट मिल्क बँकेतून दूध देणार असल्याचं जियाने याआधीच सांगितलं आहे.