जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अजबच! याठिकाणी नवस बोलल्यानंतर घातलेली Bra काढून लटकवतात महिला, कारण वाचून चक्रावाल

अजबच! याठिकाणी नवस बोलल्यानंतर घातलेली Bra काढून लटकवतात महिला, कारण वाचून चक्रावाल

अजबच! याठिकाणी नवस बोलल्यानंतर घातलेली Bra काढून लटकवतात महिला, कारण वाचून चक्रावाल

न्यूझीलंडमधील (New Zealand) कार्डोनामध्ये (Cardona) हे ठिकाण आहे. जेथे एक खास तारेचे कुंपण असून या तारांवर हजारो ब्रेसियर्स (Bra) लटकवलेल्या आहेत. अर्थात महिलांचं हे अंडरगामेंट इथं लटकवण्यामागे एक विशेष कारण सांगितलं जातं.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    वेलिंग्टन, 13 मार्च: जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जी विचित्र कारणांसाठी (Weird Places In World) प्रसिद्ध आहेत. कुठे गरम पाण्याचे झरे, तर कुठे आणखीन काही. निसर्गच काही ठिकाणांना विचित्र बनवतो, तर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांना लोकच प्रसिद्ध करतात. आज आपण अशाच एका ठिकाणाबद्दल बोलणार आहोत, ज्याला लोकांनी प्रसिद्ध केले आहे. न्यूझीलंडमधील (New Zealand) कार्डोनामध्ये (Cardona) हे ठिकाण आहे. जेथे एक खास तारेचे कुंपण असून या तारांवर हजारो ब्रेसियर्स (Bra) लटकवलेल्या आहेत. अर्थात महिलांचं हे अंडरगामेंट इथं लटकवण्यामागे एक विशेष कारण सांगितलं जातं. सेंट्रल ओटागो कार्डोना (Central Otago cardona) हे ठिकाण हजारो ब्रा लटकवलेल्या तारांमुळे खूप लोकप्रिय झाले आहे. येथे येणाऱ्या महिला त्यांनी घातलेली ब्रा काढून ती तारेला लटकवतात. आज हे ठिकाण मुख्य पर्यटन स्थळ बनलं आहे. दूरदूरवरून येणारे लोकही येथे एकदातरी भेट देतात. आता आम्ही तुम्हाला सांगतो की, येथे असं का केलं जातं ? यासाठी अनेक कथा प्रचलित आहेत. हे वाचा- स्वतःसाठी ट्रेनमध्ये बनवली ‘स्पेशल सीट’; बसताच व्यक्तीसोबत घडलं विपरीत; VIDEO जी महिला तिने घातलेली ब्रा या ठिकाणी लटकवते, तिला तिच्या आवडीचा जीवनसाथी मिळतो, असं म्हटलं जातं. त्यामुळेच येथे महिला मोठ्या संख्येने येतात व नवस मागून त्यांनी परिधान केलेली ब्रा तारेला लटकवतात. 1999 मध्ये या ठिकाणी चार ब्रा लटकलेल्या दिसल्या होत्या. त्या तिथे कोणी लटकवल्या होत्या, हे कोणालाच माहिती नाही. मात्र त्यानंतर तारेवर लटकवल्या जाणाऱ्या ब्रांची संख्या वाढतच गेली. महिला येऊन नवस बोलून तेथे ब्रा लटकवू लागल्या, आणि बघताबघता ही जागा प्रसिद्ध झाली. आता तर येथील तारेवर ब्रा लटकवणं ही एक प्रकारची परंपरा बनली आहे.

    News18

    याठिकाणावरुन काही काळापूर्वी ब्रा चोरीला जाण्याचे प्रकारही घडू लागले होते. चोरटे रात्रीच्या वेळी ब्रा चोरायचे. मात्र त्यामुळे या ठिकाणाची लोकप्रियता आणखी वाढली. येथील तारेचं कुंपण हे इतकं प्रसिद्ध झालं की ते नंतर दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागलं. या ठिकाणी महिला नवस केल्यानंतर ब्रा लटकवतात. हे वाचा- पुरुष ते ब्युटी क्वीन; अभिनेत्रीचा थक्क करणारा प्रवास, गावी पोहोचताच बघायला रांग चांगला जीवनसाथी मिळावा, यासाठी अनेकजण नवस करतात. यासाठी नवसाला पावणारी ठिकाणं म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटही दिली जाते. यातील बहुतांश ठिकाणं ही ऐतिहासिक असतात. पण न्यूझीलंडमधील कार्डोने येथील नवसाला पावणारे हे ठिकाण मानवनिर्मित आहे. येथे मुलींनी त्यांची परिधान केलेली ब्रा लटकवल्यानंतर चांगला जीवनसाथी मिळतो, असा समज आहे. अर्थात त्यावर कितीपत विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात