Home /News /viral /

चक्क एका पालीच्या प्रेमात पडले नेटिझन्स; VIDEO पाहून म्हणाले SO CUTE

चक्क एका पालीच्या प्रेमात पडले नेटिझन्स; VIDEO पाहून म्हणाले SO CUTE

Cute lizard video : या पालीने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  मुंबई, 04 डिसेंबर :  पाल (Lizard) म्हटलं तरी किळसवाणं वाटतं. तिला पाहूनच भीतीही वाटते. पाल ही तशी कुणालाच आवडत नाही. घरात पाल  (Lizard video) असणंही अशुभ मानलं जातं आणि एकदा का ती घरात दिसली की तिला घराबाहेर काढण्याची धडपड सुरू होती. कुणालाही नकोशी वाटणारी पाल कुणाला आवडते असं सांगितलं तर? साहजिकच सर्वांनाच आश्चर्य वाटेल. पण सोशल मीडियावर सध्या एका अशाच पालीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे (Cute Lizard video) . सोशल मीडियावर (Social media) अशा पालीचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे, जिला पाहताच क्षणी नेटिझन्स तिच्या प्रेमात पडले आहेत. तिला पाहूनच बहुतेक युझर्सनी सो क्युट अशी प्रतिक्रिया दिली आहे. हे वाचल्यानंतर पाल कशी काय कुणाला आवडू शकते, असंच तुम्ही म्हणाल. पण आधी हा व्हिडीओ पाहा, तेव्हाच तुम्हाला याचं उत्तर मिळले. किंबहुना तुम्हासुद्धा ही पाल आवडू लागेल.
  आता असं या पालीत नेमकं काय वेगळं आहे. तशी दिसायला तर ती एरवीच्या पालीसारखीच आहे. पण तिच्या चेहऱ्यावरील जे हावभाव आहेत, त्यामुळे ती खास दिसते. हे वाचा - Shocking video! डोकं कापलं तरी त्याच्यात जीव होता; सुटकेसाठी तडफडत होता मासा व्हिडीओत पाहू शकता या पालीच्या समोर काहीतरी आहे. जिच्याकडे ती एकटक पाहते आहे. अगदी डोळ्यांच्या पापण्याही ती हलवत नाही. शिवाय ती हसतानाही दिसते आहे. तोंडातून ती आपली जीभ बाहेर काढताना दिसते. एखाद्या बाळासारखे टकामका पाहणारे डोळे, चेहऱ्यावर गोड हसू आणि तोंडातून बाहेर येणारी जीभ यामुळे खरंच ही पाल खूप क्युट दिसते आहे. हे वाचा - VIDEO- एका शिकारासाठी सिंहांमध्ये जुंपली; सिंहिणींचा रुद्रावतार पाहून पळाला सिंह तिला पाहून एक-दोन नव्हे तर बहुतेक युझर्सच्या चेहऱ्यावरही हसू फुललं आहे. आपल्याला पाल आवडत नाही पण ही पाल खूपच क्युट आहे, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. तर अशी सुंदर पाल आपण पाहिली नाही, असंही एका युझरने म्हटलं आहे. अशा बऱ्याच प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Lizard, Other animal, Viral, Viral videos

  पुढील बातम्या