मराठी बातम्या /बातम्या /Viral /Shocking video! डोकं कापलं तरी त्याच्यात जीव होता; सुटकेसाठी तडफडत होता मासा

Shocking video! डोकं कापलं तरी त्याच्यात जीव होता; सुटकेसाठी तडफडत होता मासा

डोकं कापल्यानंतरही अचानक जिवंत झाला मासा.

डोकं कापल्यानंतरही अचानक जिवंत झाला मासा.

डोकं कापल्यानंतरही अचानक जिवंत झाला मासा.

मुंबई, 03 डिसेंबर : माणूस असो वा प्राणी त्याचं शीर (Head) धडावेगळं (Body) झाला की त्याचा मृत्यू होतो. त्याच्यात जीव राहतच नाही. अशात एका अशा माशाचा व्हिडीओ (Fish video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. जो पाहून धक्काच बसेल. या माशाचं तोंड कापलं होतं तरी तो जिवंत होता (Fish alive even after cutting head). आपला जीव वाचवण्यासाठी हा मासा धडपडत होता (Fish alive even after chopping).

तोंड धडावेगळं झालेल्या या माशाचा व्हिडीओ पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. एक व्यक्ती या माशाला कापते आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला माशाचं तोंड कापलेलं दिसतं. त्यानंतर ही व्यक्ती माशाचा इतर भाग कापायला जाते त्यावेळी मासा हलताना दिसतो. तोंडाकडील भाग उचलून तो आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. नंतर ही व्यक्ती माशावर हात ठेवून त्याच्यावरून हात फिरवताना दिसते.

हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. official_viral_clips इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्सना धक्का बसला आहे. कापल्यानंतरही तडफडणाऱ्या अशा माशाचा व्हिडीओ पाहून काही नेटिझन्स भावुकही झाले आहेत.

डोकं छाटलेला सापही झाला होता जिवंत

याआधी चीनमध्ये असं एका सापाबाबतही झालं होतं. डोकं छाटलेला कोब्रा 20 मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला होता. त्यानंतर ज्या शेफने त्याला कापलं त्याच शेफला त्याने दंश करून बदलाही घेतला होता.

हे वाचा - OMG! शीर धडावेगळं झालं तरी टुणटुण उड्या मारतं; बेडकाचा आश्चर्यकारक VIDEO VIRAL

काही प्राण्यांपासून बनवल्या जाणाऱ्या विशेष पदार्थांना तर चिनी खाद्यसंस्कृतीत खूपच महत्त्व आहे. यातीलच एक पदार्थ म्हणजे कोब्रा नागाचे सूप. एक दुर्मिळ पदार्थ म्हणून याची ओळख आहे.

टाईम्स नाऊ हिंदी डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाने कोब्रा नागाच्या सूपची ऑर्डर दिली. तेव्हा शेफ पेंग फॅन यांना दुर्मिळ पदार्थ करण्याची संधी मिळाल्याचा आनंद झाला. त्यांनी इंडोचायनीज कोब्रा नाग (Cobra) घेतला आणि त्याचे डोके छाटून टाकलं आणि ते पुढची पाकक्रिया करायला वळले.  20 मिनिटांत सूप तयार झालं आणि शेफ पेंग फॅन किचनची साफसफाई करू लागले. इथंच त्यांचे दुर्दैव आड आले. त्यांनी सूप करण्यापूर्वी कोब्राचे छाटून टाकलेलं डोकं कचऱ्यात टाकण्यासाठी उचलले आणि त्याच क्षणी त्या कोब्राने त्यांना दंश केला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

हे वाचा - VIDEO - चक्क मगरीसमोर गेलं कासव; पुढे जे घडलं ते पाहून विश्वासच बसणार नाही

सापाचे किंवा नागाचे डोके (Cobra’s Head) देहापासून वेगळे झाले तरी ते किमान एक तासभर जिवंत असते. काही वेळा ते त्यापेक्षाही अधिक काळ जिवंत राहू शकते त्यामुळे दक्षता घेणं आवश्यक आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Fish, Other animal, Shocking viral video, Viral, Viral videos