मुंबई, 03 डिसेंबर : सिंहांच्या (Lion video) शिकारीचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. कधी एखादा सिंह एकटा शिकार करताना दिसतो, तर कधी ते कळपानेही शिकार करताना दिसतात (Lion fighting video). पण यावेळी मात्र सिंह शिकारासाठी आपसातच भिडले आहेत (Lion attack video). एका शिकारासाठी सिंहांच्या कळपात जबरदस्त फायटिंग झाली. महत्त्वाचं म्हणजे या फायटिंगमध्ये सिंह आणि सिंहिणी आमनेसामने होते (Animal video).
माणसांमध्ये नवरा-बायकोची भांडणं तर आपल्याला माहिती आहेतच. पण याला प्राणीही अपवाद नाहीत, असंच वाटणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. सिंह आणि सिंहिणी आपसात भांडताना दिसले. या भांडणात सिंहिणीने असा रुद्रावतार दाखवला की बिच्चारा सिंहही तिथून पळाला.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता, सिंहाचा कळप आहे. दोन सिंहिणी आणि एक सिंह समोरासमोर उभे ठाकले आहेत. त्यांच्या मध्ये आहेत तो एक मृत प्राणी. एका बाजूने दोन सिंहिणी आणि दुसऱ्या बाजूने एका सिंहाने भक्ष्य आपल्या तोंडात धरलं आहे आणि ते एकमेकांच्या तोंडातून ते हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे वाचा - माकडांच्या 2 गटात भांडणं; एकमेकांना धू धू धुतलं, कधीही पाहिला नसेल असा VIDEO
तुम्ही जर व्हिडीओ नीट पाहिला तर या तिघांच्या शेजारी आणखी एक सिंह उभा आहे. तो यांना लढताना पाहतो आहे. त्यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी तो पुढेसुद्धा येतो. पण जशी त्याची नजर सिंहिणींकडे जाते तसं तो थोडा घाबरलेलाच दिसतो. त्यामुळे तो काय या भांडणात पडत नाही. उलट तिथं पाहूनही तो न पाहिल्यासारखा करतो आणि तिथून गुपचूप पळ काढतो.
_solivgant इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wild animal