कराची, 2 नोव्हेंबर : पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीमध्ये कट्टरपंथीयाच्या जमावाने एका हिंदू मुलावर पैंगबराची निंदा केल्याचा आरोप करीत प्राचीन मंदिरात तोडफोड केली आहे. ल्यारी भागात झालेल्या या घटनेमध्ये जमावाने पहिल्यांदा हिंदूंवर निंदेचा आरोप केला आणि त्यानंतर काही लोकांनी प्राचीन मंदिरात तोडफोड केली. यादरम्यान मंदिरात ठेवलेली गणेशाच्या आणि शंकराच्या मूर्तीची विटंबना केली. कट्टपंथींयांनी कोणताही पुरावा न देता हिंदू मुलावर निंदा केल्याचा आरोप लावला होता. स्थानिक हिंदू समुदायाने आरोप केला आहे त्यांचा छळ केला जात आहे. सांगितले जात आहे की, हे मंदिर कराचीतील भीमपुरा भाहात ली मार्केटमध्ये स्थित होते. इतकच नाही मंदिरातील देवाचे फोटोही फाडण्यात आले आहेत. गेल्या 20 दिवसात हिंदू मंदिरात तोडफोड केल्याची तिसरी घटना आहे. धार्मिक अतिरेक्यांनी देवी दुर्गेच्या मूर्तीची विटंबना सांगितले जात आहे की पाकिस्तानात हिंदू आणि त्यांच्या मंदिरात होणारे हल्ले थांबवण्याचं नाव घेत नाही. कराचीच्या घटनेपूर्वी सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यात स्थित नागारपारकरात धार्मिक अतिरेक्यांनी देवी दुर्गेच्या मूर्तीची विटंबना केली होती. या हल्लेखोरांनी मंदिरात खूप नुकसान केलं होतं. मंदिरातील पुजाऱ्यांनी सांगितले की रात्री उशिरा काही अज्ञात लोक मंदिराच्या परिसरात घुसले. यानंतर त्यांनी दरवाजा बंद केला आणि मूर्तीची विटंबना केली. त्यांनी जाता जाता मंदिराला नुकसान पोहोचवलं. आतापर्यंत हल्लेखोरांविरोधात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. हे ही वाचा- अमेरिकेतील निवडणुकीसाठी देशात केलं होम-हवन; भारतीयांचा कल कुणाकडे? हिंदूंनी केली कारवाईची मागणी मंदिराच्या जवळ राहणाऱ्या हिंदू समुदायाने या घटनेवर राग व्यक्त केला आहे. दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. हिंदू समुदायाने सांगितले की, या प्रकारच्या घटना अस्वीकार्य आहे आणि सरकारने दोषींवर कारवाई करायला हवी, अशी मागणी केली जात आहे. अन्य दुसऱ्या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, दोषींची सुटका होणार नाही. 20 दिवसांपूर्वी आणखी एका मंदिराची तोडफोड रिपोर्टनुसार 20 दिवसांपूर्वी सिंध प्रांतातील बादिन जिल्ह्यात एका मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. पाकिस्तानी मीडिया एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार या प्रकरणात तक्रारदार अशोक कुमारने आरोप केला होता की, मंदिरातील तोडफोड मोहम्मद इस्माइल उर्फ चट्टो शीदी यांनी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.