बीजिंग, 18 नोव्हेंबर : प्राण्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही शिकारीचे, काही मजेशीर, काही क्युट असतात. पण सध्या असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. किंबहुना या व्हिडीओने संपूर्ण जगाला कोड्यात टाकलं आहे. मेंढ्यांचा हा व्हिडीओ आहे. पण या मेंढ्यांचा वागणूक इतकी विचित्र आहे की त्यांचं हे वागणं रहस्य बनलं आहे. या व्हिडीओचीच सर्वत्र चर्चा होते आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सीसीटीव्ही फुटेजमध्ये मेंढ्या गोलाकार फिरताना दिसत आहेत. मोठं वर्तुळ त्यांनी केलं आहे आणि याच वर्तुळाभोवती त्या फिरत आहेत. काही मेंढ्या त्यांच्या आजूबाजूला उभ्या आहेत. तर याच व्हिडीओच्या पुढील व्हिडीओत जो एका कॅमेऱ्यात शूट करण्यात आला आहे. त्यामध्ये काही मेंढ्या त्या वर्तुळाच्या आतही दिसत आहेत. माहितीनुसार या मेंढ्या काही खातपितही नाही आहेत. पण तरी त्या ठणठणीत आहेत. हे वाचा - OMG! पाण्यात जिवंत फिरताना दिसला डोकं कापलेला मासा; व्यक्तीने हात लावताच…; पाहा VIDEO पीपील्स डेली चाइनाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार उत्तर चीनच्या मंगोलियातील ही घटना आहे. शेकडो मेंढ्या दहा दिवसांपेक्षा अधिक दिवस एका वर्तुळात गोलगोल फिरत आहे. मेंढ्या तशा निरोगी आहेत पण त्यांच्या या विचित्र वागण्याचं कारण अद्यापही रहस्य बनून राहिलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार मेंढ्यांचा मालकही हैराण झाला आहे. त्याने सांगितलं की सुरुवातीला काही मेंढ्या असं करत होत्या पण आता संपूर्ण कळप असा करू लागला आहे. त्यांच्या या वागणुकीचं कारण त्यांनाही माहिती नाही. हे वाचा - VIDEO - सिंहापासून वाचली पण…; म्हशीसोबत जे घडलं ते पाहून जंगलाचा राजाही हादरला तज्ज्ञांच्या मते, लिस्टेरियोसिस नावाच्या एका जीवाणूजन्य आजारामुळे प्राण्यांचं व्यवहार असा होतो. या आजाराच त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. मेंदूला सूज येते आणि मग भटकल्यासारखं वाटतं, शरीरारला लकवाही मारू शकतो.
The great sheep mystery! Hundreds of sheep walk in a circle for over 10 days in N China's Inner Mongolia. The sheep are healthy and the reason for the weird behavior is still a mystery. pic.twitter.com/8Jg7yOPmGK
— People's Daily, China (@PDChina) November 16, 2022
पण या मेंढ्यांच्या अशा वागणुकीचं नेमकं कारण हेच आहे की आणखी काही ते मात्र माहिती नाही. तुम्हाला याबाबत काही माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.