मुंबई, 16 नोव्हेंबर : जंगलाच्या राजा सिंहाच्या तावडीत एकदा का कुणी सापडला की त्याची सुटका अशक्यच. पण एक म्हैस मात्र या सिंहाच्या तावडीतूनही सुटली. सिंहापासून तिने कसाबसा आपला जीव वाचवला. पण पुढे तिच्यासोबत असं काही घडलं की ते पाहून जंगलाचा राजाही बिथरला. ते भयानक दृश्य पाहून सिंहाचीही पुढे जाण्याची हिंमत झाली नाही. एका जागेवर स्तब्ध उभा राहून तो फक्त पाहत राहिला.
सिंह आणि म्हशीच्या शिकारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. सिंहापासून आपला जीव वाचवण्यासाठी म्हैस पळत सुटली. तिने सिंहापासून स्वतःचा जीव वाचवलाही पण तरी मृत्यूने तिला गाठलंच. आपला जीव वाचवण्याच्या नादात ज्या ठिकाणी ती गेली तिथंही मृत्यूच तिची वाट पाहत होता असं म्हणायला हरकत नाही.
हे वाचा - एकदा वाचला पण पुन्हा तीच चूक; दुसऱ्या वेळी मात्र सिंह चवताळला आणि तरुणाला...; भयानक LIVE VIDEO
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक म्हैस पळताना दिसते आहे. तिच्या मागे सिंह लागला आहे. सिंह म्हशीची शिकार करायला आला आहे. म्हैस आपला जीव वाचवण्यासाठी पळते आहे. पळत पळत ती एका नदीवर येते. सिंहाच्या भीतीने ती नदीत उडी मारते. म्हैस नदीत गेल्यानंतर सिंह तिथंच थांबतो. कारण पुढे जे घडतं ते इतकं धक्कादायक आहे की जंगलाच्या राजाचीही पुढे जाण्याची हिंमत होत नाही.
पुढे तुम्ही पाहिलं तर म्हैस नदीत पोहोताना दिसते. सिंह काही पाण्यात येत नाही. म्हणून तीसुद्धा निश्चिंत झाली. आरामात ती नदीच्या पाण्यात पोहोत सिंहापासून दूर जात होती. पण तिला काय माहिती की ती एका मृत्यूच्या दारातून बाहेर पडली पण पुढेही मृत्यू तिची वाटत पाह आहे. दुसऱ्या मृत्यूच्या दारात जात आहे. पाण्यात दुसरा शिकारी घात लावून बसला आहे.
हे वाचा - आश्चर्य! बकरीच्या पोटी जन्माला आलं माणसासारखं पिल्लू; विश्वास बसत नाही तर पाहा PHOTO
जशी म्हैस पाण्यात जाते तसा हा पाण्यातील शिकारी तिच्याजवळ येतो आणि तिच्यावर हल्ला करतो. हा शिकारी म्हणजे मगर. व्हिडीओत तुम्ही मगरीला म्हशीजवळ येताना पाहून शकता. म्हशीलाही याची कल्पना नसते. म्हशीच्या जवळ पोहोचताच काही क्षणात म्हैस त्या मगरीच्या जबड्यात असते. सिंहही तिथं उभं राहून हे सर्व पाहत होता. त्याचीही पुढे जाण्याची हिंमत झाली नाही.
View this post on Instagram
feline.unity इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal