मुंबई, 23 जुलै : जगभरात अशा काही जागा आहेत, ज्याचं गुढं आजपर्यत कोणालाही समजू शकलेलं नाही. अशाच एका हायवेबद्दल जगभर चर्चा आहे. हा हायवे भारतातील हायवे आहे. जिथे पोहोचता वेळ अचानक बदलते आणि मृत्यूची भीतीही डोक्यावर असते. आता तुम्हाला या जागेबद्दल जाणून घेण्यासाठी आणखीच उत्सुक्ता वाढली असेल. चला या जागेबद्दल सविस्तर जाणून घेऊ. आम्ही ज्या जागेबद्दल बोललं जातंय ते झारखंडची तैमारा व्हॅली आहे. हे झारखंडमधील रांचीजवळ असेच एक रहस्यमय ठिकाण आहे. इथे गेल्यावर घड्याळाची सुई आपोआप फिरते आणि वेळ बदलते, असा स्थानिकांचा दावा आहे. NH 33 महामार्ग जो रांचीला जमशेदपूरशी जोडण्यासाठी काम करतो. याला ‘मृत्यूचा महामार्ग’ असेही म्हणतात, कारण येथे पोहोचताच वाहनांच्या वेगात अचानक बदल होतो. तैमारा दरी या महामार्गावर पडल्याने स्थानिक नागरिक दहशतीत राहतात. कारण, आजवर या व्हॅलीमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. म्हणून याला मृत्यूची व्हॅली असं देखील म्हणतात. रांचीपासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवळ आहे, जिथे पायऱ्या चढताना ताजेतवाने वाटते. अनेक पर्यटक फोटो काढण्यासाठी येथे थांबतात. लोकांचा असा विश्वास आहे की येथे पांढऱ्या रंगाच्या साडीत एक महिला फिरताना दिसते. रस्त्याच्या मधोमध चालणाऱ्या या महिलेला वाचवण्यासाठी लोकांच्या वाहनांचा अपघात होतो. अपघात टाळण्यासाठी येथे मंदिर बांधण्यात आल्याचे स्थानिक लोक सांगतात, मंदिराचे पुजारी सांगतात की, आई स्वत: कधी कधी महिलेच्या रुपात रस्त्यावर येते. एका स्थानिक शिक्षकाचा दावा आहे की त्यांच्या शाळेत बायोमेट्रिक हजेरी लावणे अशक्य होते, कारण बायोमेट्रिक हजेरी दरम्यान, हजेरी कधीकधी दुसर्याच तारखेला लागते, ज्यामुळे प्रॉबलम होतो. त्यामुळे आता त्या भागात हजेरीसाठी रजिस्टर वापरु लागले आहे. दुसरीकडे, अनेक लोक म्हणतात की कर्कवृत्ताचे उष्णकटिबंधीय भाग किंवा बिंदू भारताच्या या भागातून जाते, त्यामुळे अशा समस्या उद्भवतात. पांढऱ्या साडीतील महिलेच्या दाव्याचे अनेकांनी खंडन केले. अशी परिस्थिती असती तर हे ठिकाण उत्तम पर्यटन म्हणून कधीच विकसित झाले नसते, असे ते सांगतात. वरील माहितीची न्यूज 18 लोकमत पुष्टी करत नाही. आमचा उद्देश फक्त माहिती पोहोचवणे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.