जाहिरात
मराठी बातम्या / Viral / जुन्या घरातील भिंतीतून मिळाला लाखोंचा खजाना, पण पुढच्याच क्षणी मातीत मिळालं सारं

जुन्या घरातील भिंतीतून मिळाला लाखोंचा खजाना, पण पुढच्याच क्षणी मातीत मिळालं सारं

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

घराचं काम काढलेलं असताना खोदकामात या व्यक्तीच्या घरात अशी गोष्ट सापडली ज्याबद्दल ऐकून त्याला स्वत:ला धक्का बसला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : इतिहासात इतक्या गोष्टी लपलेल्या आहेत की त्याबद्दल आपल्याला नव्याने कळते तेव्हा ते आश्चर्यचकीत करणारं असतं. अशा अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील की जुन्या घराचं काही काम काढलं की अशा काही गोष्टी मिळता किंवा समोर येतात, ज्याबद्दल आश्चर्य वाटतं. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं आहे. घराचं काम काढलेलं असताना खोदकामात या व्यक्तीच्या घरात अशी गोष्ट सापडली ज्याबद्दल ऐकून त्याला स्वत:ला धक्का बसला. या गोष्टीबद्दल जेव्हा या व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केलं, तेव्हा ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. भारतातील रहस्यमय दरवाजा, जो उघडला तर प्रत्येक भारतीय होईल श्रीमंत ही घटना स्पेनमधील आहे. येथे एक व्यक्ती घराची जुनी भिंत दुरुस्त करत होती. तेव्हा त्याला खजाना मिळाला. ज्यामुळे ही व्यक्ती आनंदी झाली पण त्याचा काही फायदा झाला नाही. कारण या खजान्याचं भलतंच सत्य समोर आलं. या व्यक्तीला त्याच्या घराच्या भिंतीत नोटांचं बंडल मिळालं, पण हे बंडल त्याच्याकाहीच कामाचं नव्हतं, ज्यामुळे त्याच्या आनंदावर विरजन पडलं. नक्की काय घडलं? भिंतीत मिळालेले हे पैसे पाहून तो माणूस वेडा झाला, त्याला वाटले की तो इतका श्रीमंत झाला आहे की, त्याला आयुष्यभर काहीही करण्याची गरज नाही. त्याने पटकन पैसे जमा केले आणि आपले काम पटकन उरकून त्याने बँक गाठली. बँकेत पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

प्रत्यक्षात असे घडले की, जेव्हा तो या नोटांचे बंडल घेऊन पोहोचला तेव्हा त्याला सांगण्यात आले की, त्याच्या घराच्या भिंतींमध्ये सापडलेले स्पॅनिश चलन आता चलनात नाही. त्यावर फार पूर्वी बंदी घालण्यात आली होती. त्या व्यक्तीचे घर सुमारे चार दशके जुने आहे. नुकतेच त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, भिंत तोडताना पैशांनी भरलेली एक भिंती आढळून आली पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात