मुंबई 19 सप्टेंबर : कुटुंबातील किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर लोकांना फार दुखं होतं. ज्यामुळे लोक बऱ्याचदा त्या दु:खात अलसतात. ज्यातून बाहेर येण्यासाठी त्यांना वेळ लागतो. अनेक लोक तर अनेक महिने स्वत:ला घरात कोंडून ठेवतात, तसेच आपल्या आयुष्यावर बंधनं आणतात. परंतू आज आम्ही मृत्यूशी संबंधीत एक अशा परंपरेबद्दल तुम्हाला सांगणार आहोत की, जे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. जगात एक असं ठिकाण आहे जेथे लोक आपल्या मृत्यूसाठी वस्तू खरेदी करतात. हो, हे खरं आहे. तुम्हाला ऐकायला जरी हे विचित्र वाटत असलं तरी देखील हे खरं आहे. खरंतर जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या अंत्यसंस्कारासाठी वस्तू खरेदी केल्या जातात, परंतु तुम्ही कधी ऐकले आहे की, लोक जिवंत होताच त्याच्या अंत्यसंस्कारासाठी वस्तू खरेदी करतात. होय, असा एक देश आहे जिथे लोक मृत्यू येण्यापूर्वीच कबर, कपडे आणि कफन खरेदी करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यासाठी एक खास महोत्सव देखील आयोजित केला जातो, जो शुकात्सू उत्सव नावाने ओळखला जातो. हे सगळं होतं, ते जपानमध्ये. जपान असा देश आहे जिथे जिवंत लोक त्यांच्या मृत्यूनंतर आधीच आवश्यक वस्तू खरेदी करतात. येथील राजधानी टोकियोमध्ये अंत्यसंस्कार व्यवसाय मेळा आयोजित केला जातो आणि लोक येथे खरेदी करण्यासाठी येतात. दरवर्षी 16 डिसेंबर रोजी ‘शुकात्सु उत्सव’ हा उत्सवाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या सणाला ‘शुकात्सु फेस्ता’ असेही म्हणतात. टोकियोच्या शुकात्सू महोत्सवात, लोकांना मृत्यूसाठी योग्य प्रकारे तयारी कशी करावी हे शिकवले जाते. या फेस्टला आलेले लोक त्यांच्या अंत्यसंस्काराचा पोशाख निवडतात, फुलांनी भरलेल्या शवपेटीचं डिझाइन आणि आकार पाहातात आणि त्यामध्ये झोपून पोज देखील देतात एवढेच नाही तर हे लोक स्मशानभूमीत स्वत: ला दफन करण्यासाठी प्लॉट देखील खरेदी करतात. मृत्यू हा असा विषय आहे ज्याचा लोक फारसा विचार करत नाहीत. खरंतर आपल्याला मृत्यूच येऊ नये असं बरंच लोक विचार करतात. परंतू जपानमधील लोकांच्या या वागण्यामुळे तर जगालाच आश्चर्ट वाटत आहे. या व्यवसायाला ‘एंडिंग इंडस्ट्री’ म्हणतात. मृत्यूनंतर काय होते आणि ते गेल्यानंतर मग काय होईल याची लोकांना जाणीव करून देणे हा या फेस्टचा मुख्य उद्देश आहे. मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचे शरीर कसे तयार करावे हे देखील यामध्ये शिकवले जाते. जे खरोखरंच ऐकण्यासाठी खूपच धक्कादायक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.