मुंबई 31 ऑगस्ट : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्यासाठी एखाद्या मिस्ट्रीसारख्या असतात. जेथे अशा काही गोष्टी घडत असतात की, ज्याबद्दल आपल्याला अनेक प्रश्न पडतात, परंतू उत्तर मात्र सापडत नाही. एवढंच काय तर जगात असे अनेक ठिकाणं आहे, जेथे घडत असलेल्या गोष्टींबद्दल शास्त्रज्ञ देखील हैराण झाले आहेत. (Tiltepec Village In Mexico) एका अशाच गावाबद्दल माहिती समोर आली आहे, ज्याबद्दल जाणूमन घेतल्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. हो कारण या गावात जन्म घेणाऱ्या लोकांना दृष्टी नसते, म्हणजेच काय तर ते हे जग पाहू शकत नाही. परंतू हे फक्त माणसांसोबतच नाही तर प्राण्यांसोबत देखील घडतं. या गावाबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला देखील विश्वास बसू लागेल की, आजही जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जी रहस्यांनी भरलेली आहेत. ज्याची प्रश्न अनुत्तरीत आहेत. हे वाचा : पाण्याच्या बाटलीवर अशा रेषा का बनवल्या जातात? डिझाइन नाही तर यामागचं कारण दुसरंच हे गाव मेक्सिकोतील आहे. मेक्सिकोतील टिल्टपेक (Tiltepec Village In Mexico) गावाला अंधांचे गाव म्हटले जाते. या गावात माणसांपासून जनावरांपर्यंत सगळेच आंधळे आहेत. टिल्टपेक गाव हे जगातील सर्वात रहस्यमय गावांपैकी एक आहे. जगातील हे एकमेव गाव आहे जिथे फक्त अंध लोक राहतात. मेक्सिकोचे हे गाव अंधांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. या भागात झापोटेक जमात राहाते आणि येथील या विचित्र गोष्टीमुळे हे गाव जगभर प्रसिद्ध आहे. या गावात लहान मुले जन्माला येतात आणि तेव्हा ते सर्व काही पाहू शकतात, पण जन्मानंतर काही दिवसांनी त्यांची दृष्टी जाते. हे वाचा : मागवलं आईस्क्रिम, पण घरी आलं Condom… फूड डिलिव्हरी कंपनी swiggy चं चाललंय तरी काय? येथील स्थानिक लोकांचा असा समज आहे की, हे सगळं होण्यामागे येथील झाड कारणीभूत आहे. या झाडाचं नाव लावजुएला आहे आणि तो एक शापित झाड आहे, ज्याला पाहिल्यावर येथील लोकांची दृष्टी निघून जाते. ज्याला प्राणी देखील अपवाद नाहीत. परंतु शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की, हा एक अंधविश्वास आहे. तज्ज्ञांचे मत हे गावे जिथे आहेत तिथे विषारी माश्या आढळून आल्या आहेत. या माश्या चावल्यानेच लोक आंधळे होतात. याची माहिती मिळाल्यानंतर मेक्सिकन सरकारने गावकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. पण सरकारलाही यश आलेले नाही. सरकारने या जमातीला दुसऱ्या ठिकाणी स्थायिक करण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर ठिकाणचे वातावरण त्यांच्यासाठी अनुकूल नव्हते. आता त्या लोकांना मजबुरीने त्यांच्या अवस्थेत सोडण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.