जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'या' समुद्राचं रहस्य आश्चर्यचकीत करणारं... मध्यभागी जाताच संपतं आयुष्य

'या' समुद्राचं रहस्य आश्चर्यचकीत करणारं... मध्यभागी जाताच संपतं आयुष्य

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अगदी माणूस जरी गेला तर त्याचा जीव तो गमावू शकतो. तसेच या भागात कोणतेही सजीव नाहीत. अगदी झाडं देखील नाहीत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 10 डिसेंबर : कोणत्याही गुढ किंव रहस्यमयी गोष्टींबद्दल जाणून घेणं लोकांना फार आवडतं. मग ती कोणतीही जागा असोत, ठिकाण असोत, वस्तु असोत किंवा मग समुद्र. आपण लोकांना असं म्हणताना नक्की ऐकलं असणार की समृद्राने त्याच्या पोटात खूप काही गोष्टी लपवून ठेवल्या आहेत. ज्या आपल्या सर्वांसाठीच रहस्यमयी आहेत. म्हणून तर अनेक डायव्हर्स लोक समृद्राच्या खोलात जाऊन काही ना काही रिसर्च करतात किंवा वस्तुंचा शोध घेत असतात. पण वैज्ञानिकांना शोध लावताना एका गोष्टीचा खुलासा झाला की लाल समुद्राजवळ अशी एक जागा आहे, येथे कोणीही जिवंत राहू शकत नाही. अगदी माणूस जरी गेला तर त्याचा जीव तो गमावू शकतो. तसेच या भागात कोणतेही सजीव नाहीत. अगदी झाडं देखील नाहीत. हे ही वाचा : Keyboard वरील शब्द हे एका क्रमाने का नसतात? यामागचं कारण फारच कमी लोकांना माहीत समुद्राच्या अशा रहस्याबद्दल जाणून अनेकांना असा प्रश्न पडला आहे की हे कसं शक्य आहे? समुद्रात कोणते जलचर जिवंत राहात नाही, हे तर फारच विचित्र आहे. यामागचं कारण जाणून घेण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत. लाल समुद्रात आढळणारा हा दुर्मिळ खारा समुद्र आहे. जो खूपच खारट आहे. काही शास्त्रज्ञांच्या टीमने हा हा भाग शोधून काढला आहे. या टीमचा भाग असलेल्या एका शास्त्रज्ञाने खुलासा केला की या भागामध्ये अजिबात ऑक्सिजन नाही आणि त्यामुळेच येथे कोणत्याही जीवाचे अस्तित्व अशक्य आहे. शास्त्रज्ञांना लाल समुद्राच्या पृष्ठभागावर 10 फूट लांबीचा खारट तलाव सापडला आहे जो समुद्रातील प्राणी आणि मानवांसाठी अत्यंत धोकादायक आहे. हा अद्वितीय तलाव जास्त खारट आहे. या शोधामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या मर्यादा शोधण्यात मदत होऊ शकते. ‘टाइम्स नाऊ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मियामी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या टीमने ‘डेथ पूल’चा शोध लावला. या शोधातून असे दिसून आले की ब्राइन पूलमध्ये ऑक्सिजन नसतो, ज्यामुळे ते कोणत्याही सागरी जीवाला त्वरित मारू शकते.

    News18लोकमत
    News18लोकमत

    खरंतर हा खारा तलाव लाल समुद्राच्या खाली जवळ-जवळ 1,770 मीटर खोल आहे. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की समुद्राच्या इतक्या खोलवर गेल्यावर आधीच ऑक्सिजनची कमतरता भासते. त्यात हा तलाव आणखी खोल, त्यात तो खारट असल्यामुळे त्यामधील ऑक्सिजन पूर्णच संपतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात