मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Keyboard वरील शब्द हे एका क्रमाने का नसतात? यामागचं कारण फारच कमी लोकांना माहीत

Keyboard वरील शब्द हे एका क्रमाने का नसतात? यामागचं कारण फारच कमी लोकांना माहीत

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

कधी तुम्हाला असा प्रश्न पडलाय का की यावरील अक्षरे हे लाईनीत म्हणजेच A,B,C,D,E,F... हे सरळ एका रेषेत का लिहिलेलं नसतं? ते वर खाली किंवा इकडे तिकडे का असतात?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 09 डिसेंबर : आपल्या आजूबाजूला अशा अनेक वस्तु असतात. ज्याकडे आपण फारच लक्ष देत नाही किंवा त्याला निरखून पाहात नाही. पण त्याच्या आकारा मागे किंवा रंगांमागे काही ना काही अर्थ हा नक्कीच असतो. फक्त तो आपल्याला माहित नसतो. आता हेच बघाला. आपल्यापैकी सर्वच लोकांनी कंप्यूटर वापरला असणार, एवढंच काय तर आपल्या मोबाईलवर देखील किबोर्ड असतो. जेथून आपण सगळ्या गोष्टी टाईप करतो.

पण कधी तुम्हाला असा प्रश्न पडलाय का की यावरील अक्षरे हे लाईनीत म्हणजेच A,B,C,D,E,F... हे सरळ एका रेषेत का लिहिलेलं नसतं? ते वर खाली किंवा इकडे तिकडे का असतात?

आपल्यापैकी कोणाला असा प्रश्न पडलाय का? शब्द इकडे-तिकडे वापरुन किबोर्डला इतकं कॉम्प्लीकेटेड का केलं आहे? तसेच जर तुम्ही लॅपटॉप/कंप्यूटरचा किबोर्ड पाहिला तर तुम्ही पाहिलं असेल की F आणि J बटणावर लाईन असते किंवा हलगा फुगवटा असतो. पण हे असं का असतं?

हे ही वाचा : ... आणि ते एका रात्रीत झाले करोडपती, एका अजब गावाची गजब गोष्ट

सहसा लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. इतर सर्व बटणे सोडली तर फक्त या दोन बटणांवर अशी खूण का?(Keyboard Buttons) हे अनेकांना माहीत नसते, पण ते एका खास कारणासाठी बनवले जाते. ज्या लोकांना टाईप कसे करावे हे माहित आहे, म्हणजेच ट्रेंड टायपिंग करणाऱ्या लोकांना या दोन बम्प्सची टायपिंगमध्ये मदत होते.

ज्यांनी टायपिंगचे प्रशिक्षण घेतले आहे, त्यांना कीबोर्डवर टायपिंग करताना हात कसे ठेवले जातात हे चांगलेच माहीत आहे. टायपिंगसाठी बोटे व्यवस्थित सेट करता यावीत म्हणून हे बंप बनवले जातात.

माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की टायपिंग करताना, डाव्या हाताची सर्वात लहान बोट A अक्षरावर ठेवली जाते आणि त्यानंतरची बोटे S, D, F या अक्षरांवर ठेवली जातात.

तर उजव्या हाताची सर्वात लहान बोट कोलनवर ठेवलं जातं आणि त्यानंतरची सर्व बोटे L, K, J या अक्षरांवर ठेवली जातात. अशा प्रकारे, कीबोर्डच्या मधल्या ओळीवर टाइप करताना, अंगठे हवेत असताना सर्व आठ बोटे बटणावर ठेवली जातात, ज्याचा वापर स्पेसबार दाबण्यासाठी केला जातो.

या प्रकरणात, फक्त बोटे योग्यरित्या सेट करण्यासाठी, F आणि J वर फुगे तयार केले जातात. तसेच कमी प्रकाशात किंवा अगदी अंधारातही फुगवटा जाणवत असताना एखादी व्यक्ती सहजपणे टाइप करू शकते.

आता प्रश्न असा आहे की, कीबोर्ड बटणे क्रमाने का नसतात?

कीबोर्डबद्दल बोलताना, आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित आणखी एक तथ्य सांगतो. तुम्हाला अनेकदा प्रश्न पडला असेल की कीबोर्डची बटणे A, B, C, D या क्रमाने का नसतात, म्हणजेच एका बाजूने सुरुवात करून त्या क्रमाने पुढे सरकतात. वास्तविक, यामागचे कारणही टायपिंग आहे.

कीबोर्डच्या किज् इंग्रजी अक्षरांच्या योग्य क्रमाने बनविल्या गेल्यास, जलद टाईप करणे खूप कठीण होईल. या कारणास्तव अक्षरे QWERTY कीबोर्ड स्वरूपात तयार केली जातात ज्यामध्ये ते सर्वत्र पसरलेले असतात.

First published:

Tags: Marathi news, Shocking news, Viral, Viral news