जाहिरात
मराठी बातम्या / Viral / तब्बल 20 मिनिटं आकाशात दिसले रहस्यमय 'बर्निंग ट्रेल', VIDEO पाहून शास्त्रज्ञही चक्रावले

तब्बल 20 मिनिटं आकाशात दिसले रहस्यमय 'बर्निंग ट्रेल', VIDEO पाहून शास्त्रज्ञही चक्रावले

तब्बल 20 मिनिटं आकाशात दिसले रहस्यमय 'बर्निंग ट्रेल', VIDEO पाहून शास्त्रज्ञही चक्रावले

लॉकडाऊनमध्ये दिसला निसर्गाचा खेळ, अवकाशात टिपल्या गेल्या रहस्यमय हालचाली. VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 20 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळं काही ठिकाणी प्राणी जंगलातून थेट रस्त्यांवर आले आहेत. तर काही ठिकाणी आकाशात विचित्र घटना घडताना दिसत आहेत. असाच प्रकार ब्रिटनमधील केम्ब्रिजशायर येथे घडला. केम्ब्रिजशायर येथील स्थानिक रहिवासी, गॅरी अंडरवुड यांनी रात्री अचानक लाल आणि नारिंगी रंगाची रहस्यमयव वस्तू पाहिली. यातून ज्वाळांचा उद्रेक होत होता. जवळजवळ 20 मिनिटे ही वस्तू आकाशात होती. गॅरी यांनी याचा व्हिडीओ काढल्यानंतर ही वस्तू नेमकी काय आहे, याचा उलघडा काही काळ शास्त्रज्ञांनाही झाला नाही गॅरी यांनी काढलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नॅशनल स्पेस अकादमी या संस्थेच्या तज्ज्ञांनी या दृष्टीक्षेपाचे स्पष्टीकरण दिले आहे. या केंद्राचे शिक्षण व शिक्षक प्रमुख, सोफी अॅलन यांनी, हे जास्त उंची असलेले जेट असल्याची शक्यता वर्तवली आहे. वाचा- कुंभकर्णाला लाजवेल अशी झोप तर गर्जनेइतकं भीतीदायक घोरणं, सिंहाचा VIDEO व्हायरल अॅलन यांनी या जेटवर सूर्यास्त झाल्यामुळे नांरगी छटा निर्माण झाल्याचे सांगितले. अॅलन पुढे म्हणाले की, “सूर्यास्तामुळे कॉन्ट्राईलचा जास्त भाग लाल आणि नारंगी झाला. आकाशात जेव्हा मुख्यतः बर्फाच्या क्रिस्टल्सचा समावेश असतो तेव्हा आकाशात जाताना लाइन-आकाराच्या ढगांसाठी कॉन्ट्रेल ही संज्ञा आहे”. मात्र यानंतरही लोकांनी ही वस्तू हालचाल का करत होती, असा प्रश्न विचारला आहे. वाचा- डोकं दुखायला लागलं म्हणून केलं अ‍ॅडमिट, X-ray पाहून डॉक्टरांनाच भरली धडकी डेली मेलनं टाकलेल्या या व्हिडीओमध्ये 20 मिनिटे आकाशात काय घडलं हे पाहू शकता. वाचा- VIDEO : लॉकडाऊनला कंटाळून रस्त्यावर आली महिला, पोलीस येताच काढले कपडे आणि… केम्ब्रिजशायर येथे राहणारे गॅरी अंडरवूडने आपल्या पत्नीसोबत असताना त्यांनी सर्वप्रथम हे चित्र पाहिले. त्यांनी काढलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या, मात्र अॅलन यांनी ही रहस्यमय वस्तू नसल्याचे स्पष्ट केले आहे. अॅलन यांच्या मते, “व्हायरल होत असलेले फोटो काढण्यापूर्वी कार्गो विमानाने 34 हजार फूट मिनिटांवर ओव्हरहेड फ्लाइट गेले होते. यामुळे हा प्रकार घडला असावा. सध्या विमाने बंद असल्यामुळे, आणि निरभ्र आकाशामुळे हे सगळे नैसर्गिक प्रकार घडत आहेत". कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर विविध नैसर्गिक गोष्टींचा उलगडा होत आहे. संपदन, संकलन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात