Home /News /viral /

कुंभकर्णाला लाजवेल अशी झोप तर गर्जनेइतकं भीतीदायक घोरणं, सोशल मीडियावर सिंहाचा VIDEO व्हायरल

कुंभकर्णाला लाजवेल अशी झोप तर गर्जनेइतकं भीतीदायक घोरणं, सोशल मीडियावर सिंहाचा VIDEO व्हायरल

जंगलचा राजा झोपताना सुद्धा दिमाखात झोपतो. आणि जर तो घोरत असेल, तर त्याच्या गर्जनेसारखाच मोठा आवाज येतो. सध्या इंटरनेटवर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

    मुंबई, 17 एप्रिल : माणसासह सर्वच प्राण्यांना त्यांची झोप प्रिय असते. अनेकजण त्यांच्या पाळीव प्राण्यांचे झोपण्याचे व्हिडीओ शेअर करत असतात. मात्र जंगलचा राजा झोपताना सुद्धा दिमाखात झोपतो. आणि जर तो घोरत असेल, तर त्याच्या गर्जनेसारखाच मोठा आवाज येतो. सध्या इंटरनेटवर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक सिंह मोठ्या दिमाखात झोपला आहे आणि तो चक्क मोठमोठ्याने घोरत आहे. (हे वाचा-कोरोनाला दूर ठेवण्यासाठी हा प्राणी सांगतोय हात धुण्याची पद्धत, पाहा VIDEO) आयएफएस सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी असं कॅप्शन दिलं आहे की, 'जेव्हा राजा घोरतो तेव्हा तो आवाज त्याच्या गर्जनेपेक्षाही मोठा असतो. सिंह त्याच्या जंगलामध्ये साधारण 18 ते 20 तास झोपतात. सिंहिण मात्र तिच्या छाव्यांची काळजी घेते आणि त्यामुळे केवळ 12 तास झोपणं तिला शक्य होतं.' सुशांत नंदा अनेकदा असे व्हिडीओ शेअर करत असतात. यावेळी त्यांनी शेअर केलेल्या सिंहाच्या व्हिडीओला विशेष पसंती मिळत आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केली आहे की त्यांना माहितही नव्हतं की सिंहसुद्धा घोरतो. काही दिवसांपूर्वी सुशांत नंदा यांनी असाच एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये सिंहीण आणि तिची छावे एका पाठोपाठ एक जात हते. या सिंहाची संख्या मोजताही येणार नाही इतकी आहे. तेवढ्यात समोरून एक गाडी येत असलेली या व्हिडीओत पाहायला मिळते आहे. विचार करा त्या गाडीमध्ये बसलेल्यांच काय झालं असेल. या व्हिडीओमध्ये आपण स्पष्ट पाहू शकतो सिंहाचा कळप पाहून गाडीचा ड्रायव्हर एकदम गाडी थांबवतो. सिंहाच्या छाव्यांना जाण्याची तो वाट पाहत असतो. मात्र त्यांची रांग संपतच नाही आहे. रस्ता ओलांडून ते सर्वजण बाजूलाच असणाऱ्या गवतात जातात. सर्वात मजेशीर बाब म्हणजे हे सर्वजण एका रांगेत रस्ता ओलांडत आहेत. जणू काही त्यांच्या आईने त्यांना शिस्तीत चालण्यासाठी सांगितलं आहे. संपादन- जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या