समुद्र किनाऱ्यावर सापडला 15 फूटी लांब मृतदेह, रहस्यमय PHOTO पाहून लोक हादरले

समुद्र किनाऱ्यावर सापडला 15 फूटी लांब मृतदेह, रहस्यमय PHOTO पाहून लोक हादरले

रहस्यमयी जीव सापडल्याने खळबळ, या फोटोवरून तुम्हाला तरी ओळखता येत आहे का पाहा.

  • Share this:

लिव्हरपूल, 05 ऑगस्ट: एका रहस्यमय फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक 15 फूटी लांब रहस्यमय प्राणी दिसत आहे. ब्रिटिश समुद्रकिनाऱ्यावर या रहस्यमय प्राण्याचा सडलेल्या अवस्थेतील अवशेष सापडले आहे. लिव्हरपूल इकोच्या मते, 29 जुलैला Ainsdale बीचवर एका व्यक्तीला एक मृतदेह सापडला. हा एक प्राणी असल्याचे कळत होते, मात्र कोणता प्राणी हे कळत नाही आहे.

या फोटोमध्ये या प्राण्याला चार विचित्र पाय असल्याचे दिसत आहे. याची उंची साधारण 15 फूट लांब असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या व्यक्तीने या प्राण्याचे फोटोही काढले आहे. या इसमाने फोटो अपलोड करताना असे लिहिल आहे की, या प्राण्याच्या शरीरावर एक गोष्ट संलग्न आहे. कदाचित ही मादी असावी आणि जन्म देत असताना मृत्यू झाला. विचित्र दिसणार्‍या प्राण्याचे फोटो फेसबुकवर Ainsdale ग्रुपवर पोस्ट करण्यात आले आहेत. चित्रात असे दिसते की समुद्राच्या किनाऱ्यावर एक विशाल प्राणी पडलेला आहे आणि त्याच्या शरीरावर वाळू अडकली आहे.

वाचा-तिखट मोमोज खाल्ल्यामुळे पोटात झाला स्फोट, रुग्णांची अवस्था पाहून डॉक्टरही हादरले

Can anyone guess what this is on Ainsdale Beach.

Elephant?

Whale?

Monster?

Bizarrley it has/had 4 flippers. Most odd....

Posted by Ainsdale on Wednesday, July 29, 2020

वाचा-VIDEO: ...आणि एका क्षणात झाले ट्रॅक्टरचे दोन तुकडे, बाइक चालकाचा मृत्यू

ही पोस्ट 29 जुलै रोजी शेअर करण्यात आली आहे. द सनच्या वृत्तानुसार, नॅचरल इंग्लंडचे वरिष्ठ सल्लागार स्टीफन अय्यलिफ म्हणाले की, त्या प्राण्याची ओळख पटवणे कठिण आहे.

वाचा-...आणि अचानक आकाशातून खाली पडताना दिसली उल्का, अद्भुत VIDEO VIRAL

ते म्हणाले की, हा प्राणी समुद्र तटावर राहणारा प्राणी आहे. त्याचे शरीर कुजल्यामुळे ओळख पटवणे कठिण आहे. ही व्हेलची एक प्रजाती असू शकते.

Published by: Priyanka Gawde
First published: August 5, 2020, 1:51 PM IST

ताज्या बातम्या