मराठी बातम्या /बातम्या /Viral /मुस्लीम व्यक्तीनं 10 वर्ष केला अनाथ मुलीचा सांभाळ; आता हिंदू मुलाशी लग्न लावत दिला खास संदेश

मुस्लीम व्यक्तीनं 10 वर्ष केला अनाथ मुलीचा सांभाळ; आता हिंदू मुलाशी लग्न लावत दिला खास संदेश

18 वर्षांच्या पूजाचं गेल्या शुक्रवारी लग्न झालं. तिचा 10 वर्षं सांभाळणाऱ्या गृहस्थाचं नाव आहे महबूब मसली.

18 वर्षांच्या पूजाचं गेल्या शुक्रवारी लग्न झालं. तिचा 10 वर्षं सांभाळणाऱ्या गृहस्थाचं नाव आहे महबूब मसली.

18 वर्षांच्या पूजाचं गेल्या शुक्रवारी लग्न झालं. तिचा 10 वर्षं सांभाळणाऱ्या गृहस्थाचं नाव आहे महबूब मसली.

  बंगळुरु 02 ऑगस्ट : आपला भारत देश हा सामाजिक एकता आणि सौहार्द याची अनेक उदाहरणं जगासमोर कायमच ठेवत आला आहे. सामाजिक एकतेची अनेक उदाहरणं आपण बातम्यांतून वाचत असतो आणि आपल्याला आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. अनेक धर्म, पंथ असलेल्या भारतात सगळे गुण्यागोविंदाने राहतात. अशीच एक घटना कर्नाटकातल्या (Karnataka) विजयपुरा इथं घडली आहे. इथं एका मुस्लिम गृहस्थाने (Muslim man) अनाथ झालेल्या एका हिंदू मुलीचा (Hindu girl) 10 वर्षं सांभाळ केला आणि त्यानंतर तिचं हिंदू मुलाशी लग्नही (Marriage) लावून दिलं. याबाबतचं वृत्त लाइव्ह हिंदूस्थाननी दिलं आहे.

  ही बातमी महत्त्वाची आहे कारण या पित्याने त्या मुलीचा संभाळ केला पण तिला इस्लाम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती केली नाही. 18 वर्षांच्या पूजाचं गेल्या शुक्रवारी लग्न झालं तिचा 10 वर्षं सांभाळणाऱ्या गृहस्थाचं नाव आहे महबूब मसली. त्यांनी वैदिक पद्धतीने एका हिंदू मुलासोबत पूजाचं लग्न लावून दिलं आणि तिला माहेरातून सासरी पाठवलं.

  डिलिव्हरी बॉयनेच केली महिलेची Delivery; थ्री इडियट्सच्या Ranchoची आली आठवण

  आई-वडील दोघांचंही छत्र हरपल्यामुळे पूजा वाडिगेरी 10 वर्षांपूर्वीच अनाथ झाली होती. तिच्या नातेवाईकांनी तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी झटकली. त्यानंतर मसली यांनी तिचा सांभाळ केला. मसली यांना स्वत: च्या दोन मुली आणि दोन मुलं आहेत. त्यांनी पूजाचा सांभाळ केला. समाजात असे अनेकजण असतात जे समाजासमोर आदर्श निर्माण करतात. ते लोक भाषणं देत नाहीत तर आपल्या वागण्यातून आदर्श निर्माण करतात.

  मसली म्हणाले, ‘ पूजा 10 वर्षांहून अधिक काळ माझ्या घरात राहिली पण मी तिला इस्लाम धर्म स्वीकारायला सांगितलं नाही. तिचं धर्मांतर केलं नाही किंवा एखाद्या मुस्लिम व्यक्तीबरोबर तिचं लग्नही लावून दिलं नाही. तसं करणं आमच्या धर्माविरुद्ध आहे. त्यामुळे ती ज्या धर्माची म्हणजे हिंदू धर्माची आहे त्या धर्माच्या मुलाशी तिचं लग्न लावून देणं ही माझी जबाबदारी होती. त्यानुसारच मी एक सुयोग्य हिंदू मुलगा शोधला आणि त्यांचा विवाह करून दिला.’

  रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसला जंगलाचा राजा; धडकी भरवणारा VIDEO आला समोर

  एएनआय या वृत्तसंस्थेशी मसली यांनी संवाद साधला. ‘या हिंदू मुलाच्या आईवडिलांनी कुठलाही हुंडा न मागता हसत हसत पूजाचा स्वीकार केला. त्यामुळेच आज हे लग्न होऊ शकलं. मला वाटतं की समाजातील विविध धर्मांतील लोकांनी सामाजिक सलोखा राखला पाहिजे आणि आनंदानी राहिलं पाहिजे,’ असंही मसली म्हणाले.

  विजयपुरा शहरामध्ये विविध धर्मांच्या आणि सेवाकार्यामध्ये मसली यांचा सहभाग असतो. मसली हे सामाजिक कार्यकर्ते असून शहरातील गणपती उत्सवातही ते उत्साहाने सहभागी होतात. आपल्या या पित्याबद्दल पूजा म्हणाली, ‘माझे जन्मदाते आईवडिल गेल्यानंतर मला असे आईवडिल मिळाले हे माझं भाग्य समजते. त्यांनी माझा सांभाळ केला आणि माझं लग्न लावून दिलं. मला त्यांच्या ऋणात सदैव रहायला आवडेल.’

  First published:
  top videos

   Tags: Marriage, Muslim, Positive story