सर्वसामान्य पणे घरातील सामानांची डिलिव्हरी करण्यासाठी कंपनीकडून डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) पोहोचतात. मात्र एका ब्रिटिश डिलिव्हरी बॉयसोबत जे काही झालं त्यानंतर त्याचं नाव वृत्तपत्राच्या हेडलाइन्समध्ये झळकलं आहे. Perry Ryan तर गेल्या होता सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी मात्र त्याला एका महिलेची डिलिव्हरीदेखील (Delivery Man) करावी लागली आणि तो ठरला ‘डिलिव्हरी मॅन.’ (The woman was delivered by a delivery boy in Britain) 29 वर्षीय पेरी रायन व्यवसायाने डिलिव्हरी बॉय आहे आणि फुटबॉल खेळाडू देखील आहे. त्याने आपला डिलिव्हरी बॉयचं टायटल प्रत्यक्षात उतरवलं आणि चक्क एका महिलेची डिलिव्हरी केली. तो ज्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी गेला होत्या त्याजवळील घरात एकट्या गर्भवती महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ते तिच्याकडे गेले. पॅरामेडिकल स्टाफ तिथे पोहचेपर्यंत पेरीने त्यांची काळजी घेतली आणि याच दरम्यान त्या बाळाचा जन्म झाला. हे ही वाचा- रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसला जंगलाचा राजा; धडकी भरवणारा VIDEO आला समोर सामान डिलिव्हरी करण्यासाठी गेला असताना पेरीने ऐकला आवाज Perry Ryan ने सांगितलं की तो सामान डिलिव्हरी करण्यासाठी (Delivery Boy) गेला होता. यादरम्यान महिलेचा वेदनेने ओरडण्याचा आवाज त्याने ऐकला. त्याला काहीच कळत नव्हतं. मग त्याने थांबून घरात डोकावून पाहिलं तर 30 वर्षांची महिला जमिनीवर पडली होती. आणि ती जोरजोराने ओरडत होती. त्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र महिला फार काही सांगू शकली नाही. मात्र महिलेच्या डिलिव्हरीची वेळ आल्याचं मुलाच्या लक्षात आलं. त्याने पॅरामेडिक्स (Paramedical Staff) ला फोन केला आणि स्वत: महिलेची मदत करू लागला. महिलेचे पती जवळच एका दुकानात काम करतात. शेजारच्यांनी त्यांना फोन करताच ते धावत घरी पोहोचले. डॉक्टरांशिवाय झाली डिलिव्हरी घरात पोहोचल्यानंतर महिलेच्या पतीने तिची हालत पाहताच धक्का बसला. तेव्हा पेरीने फोनवरुन मिडवाइफकडून (health professional) सूचना घेण्यास सुरुवात केली आणि पतीला डिलिव्हरी कशी करायची ते समजावू लागला. बऱ्याच प्रयत्नांनंतर पेरी आणि महिनेच्या पत्नीने मिळून तिची डिलिव्हरी केली. महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर पेरी म्हणाला की, त्याच्यासाठी हे खूप वेगळं होतं. याआधीच कधीच त्याने असा विचारही केला नव्हता. बाळाच्या डिलिव्हरीनंतर सर्वांनी त्याचे आभार मानले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.