रांची 13 फेब्रुवारी : सामाजिक सलोख्याचं एक अतिशय हृदयस्पर्शी प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. हे प्रकरण झारखंडमधील दुमका येथील आहे. यात राणीश्वरच्या हामीदपूर येथे राहणारा नौशाद शेख नावाचा मुस्लीम व्यक्ती 40 लाख खर्चून भगवान कृष्णाचे मंदिर बांधत आहे (Muslim Man Built Krishna Temple). भगवान श्रीकृष्णाचे ‘पार्थ सारथी मंदिर’ सध्या परिसरात चर्चेचा विषय आहे. नौशाद यांनी 2019 मध्ये या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. नौशाद सांगतात की एकदा ते पश्चिम बंगालमधील मायापूरला फिरायला गेले होते. याच दरम्यान त्यांच्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण आले होते. भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की ‘मी स्वतः तुझ्या परिसरात बसलो आहे. मग तू मला भेटायला इथे का आला आहे?’ नौशाद यांनी सांगितलं की, तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना स्वप्नात सांगितलं होते की, ‘तिथेच पोहोच.’ यानंतर नौशाद यांनी पार्थ सारथी मंदिर बांधण्याचा विचार केला. नौशाद यांनी सांगितलं की, पूर्वी इथे खुल्या आकाशाखाली देवाची पूजा केली जात होती.
गॅरेज शेडमधली पहिली स्कूटर ते ‘हमारा बजाज’, राहुल बजाज यांचा प्रेरणादायी प्रवास
यानंतर त्यांनी स्वतः मंदिर बांधण्याचा विचार केला. मंदिराच्या बांधकामापासून ते सर्व विधी नौशाद स्वत: आयोजित करणार आहेत. ते म्हणतात की, इस्लाम धर्मात गरजूंची सेवा करण्यास सांगितलं आहे. यासोबतच प्रत्येक धर्माचा आदर करा, असंही म्हटलं आहे. अशाच गोष्टी सर्व धर्मात सांगितल्या जातात. पार्थ सारथी मंदिराचा अभिषेक १४ फेब्रुवारीला होणार आहे. या दरम्यान पिवळ्या कपड्यांतील 108 महिला कलश यात्रा काढणार असून 51 पुजारी संपूर्ण वैदिक मंत्रोच्चारात हा विधी पूर्ण करणार आहेत. नौशाद म्हणाले की, आतापासून मंदिराच्या आवारातच हवन करता येणार आहे. याशिवाय मंदिराच्या आवारात कीर्तन शेड, स्वयंपाकघर आणि पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांसाठी स्वतंत्र खोली तयार करण्यात येत आहे. हेतमपूर इस्टेटमधील पुती महाराज यांनी 300 वर्षांपूर्वी पार्थ सारथीच्या पूजेला सुरुवात केल्याचं जाणकार सांगतात. तेव्हा या ठिकाणी हेतमपूर संस्थानाचा दरबार असायचा. त्या काळात ते जंगल महाल म्हणून ओळखलं जात होतं.
खेळण्याच्या वयात आली कुटुंबाची जबाबदारी; 3 वर्षीय मुलीची कथा वाचून पाणावतील डोळे
हेतमपूर संस्थानाच्या राजाने पार्थ सारथी मेळा सुरू केला होता. मात्र जमीनदारी संपुष्टात आल्यानंतर येथील पूजेचं काम बंद पडलं. चार दशकांनंतर पार्थसारथी उपासनेला कादिर शेख, अबुल शेख आणि लियाकत शेख यांनी पुनरुज्जीवित केलं. या तिघांच्या मृत्यूनंतर नौशाद शेख 1990 पासून ही परंपरा पुढे नेत आहेत.