जयपूर 12 फेब्रुवारी : राजधानीतील बागरूजवळील मोहनपूरा गावात असा 'पगडी विधी' झाला, जो पाहून तिथे उपस्थित सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू तरळले (3 Years old Girl Performed Turban Ritual). पंच पटेलांनी तीन वर्षांच्या निष्पाप मुलीच्या डोक्यावर फेटा बांधला तेव्हा उपस्थितांसह ते स्वतःही भावुक झाले. अशाप्रकारे कोणाच्याही डोक्यावर पगडी बांधण्याची वेळ येऊ नये, अशीच प्रार्थना सगळे करत होते. मोहनपूरामध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर पंच पटेलांनी तीन वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यावर फेटा बांधून तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी सोपवली.
हसण्या-खेळण्याच्या वयात या चिमुकलीच्या डोक्यावर पगडी बांधण्यात आल्याचं पाहून सगळेच भावुक झाले. या घटनेत मोहनपूरामधील सुनिल टोडावता यांचं आकस्मिक निधन झालं. त्यांना मुलगा नसून एकुलती एक तीन वर्षीय अनम नावाची मुलगी आहे. याच कारणामुळे पंट पटेलांनी या विधीसाठी अनमलाच बसवलं. यानंतर समाजातील लोकांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विधी पार पाडला.
यावेळी राजस्थान सरपंच संघाचे अध्यक्ष बंशीधर गढवाल, अनमचे आजोबा रामफूल शेरावत, माजी नगरसेवक गीता चौधरी शेरावत, माजी युवक काँग्रेसचे अध्यक्ष बागरू अशोक शेरावत, रामलाल शेरावत, जगदीश शेरावत, आजोबा रामपाल हरलाल रामकरण नंदाराम, प्रभुदयाल आणि नागपाल टोडावता आदी उपस्थित होते. .
काय आहे हा विधी -
ही एक सामाजिक प्रथा आहे ज्याचे पालन हिंदू, शीख यांच्यासह सर्व धार्मिक समुदाय करतात. या प्रथेनुसार, कुटुंबातील ज्येष्ठ पुरुषाच्या मृत्यूनंतर, पुढच्या सर्वात मोठ्या जिवंत मुलाच्या डोक्यावर विधीपूर्वक पगडी बांधली जाते. पगडी हे या भागातील समाजात आदराचे प्रतीक आहे, हे यातून दिसून येतं. ज्याच्या डोक्यावर पगडी बांधली जाते, तो व्यक्ती कुटुंबाच्या सन्मानाची आणि कल्याणाची जबाबदारी घेतो. पगडीचा विधी अंतिम संस्काराच्या चौथ्या दिवशी किंवा तेराव्या दिवशी केला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death, Emotional, Small girl