मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या ट्रेनसमोर हा प्रकार घडला. यावेळी या ट्रेनचे लोको पायलट एस के प्रधान आणि सहाय्यक एल पी रवी शंकर यांनी ट्रेनचे आपात्कालिन ब्रेक दाबून वृद्ध व्यक्तीचे प्राण वाचवले. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेल्वे प्रशासनाकडू रेल्वे क्राॅस करणे जीवावर बेतू शकते असे वारंवार सांगितलं जाते. मात्र तरीही अशा प्रकारच्या घटना घडतच असतात. दरम्यान या वेळेत रेल्वे थांबवल्यामुळे वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, ट्रेनच्या खाली वृद्ध व्यक्ती आली होती, मात्र ट्रेन वेळेवर थांबली आणि रेल्वे चालक व लोको पायलटने त्यांना बाहेर काढले. यानंतर अनेक लोक तेथे जमा झाले होते.कल्याण स्टेशन येथे वयोवृ्द्ध व्यक्ती रेल्वे लाईन क्राॅस करताना इंजिन खाली आला. त्यावेळेस अचानक ब्रेक दाबून रेल्वे चालकाने प्रसंगावधान राखत त्या व्यक्तीचे प्राण वाचवले. pic.twitter.com/W57bNUE9CB
— News18Lokmat (@News18lokmat) July 18, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kalyan, Railway, Railway accident, Shocking viral video