मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'ते 5 महिने, तो आरोपी आणि मुंबई पोलीस', लैंगिक छळ झालेली महिला सोशल मीडियावर व्यक्त

'ते 5 महिने, तो आरोपी आणि मुंबई पोलीस', लैंगिक छळ झालेली महिला सोशल मीडियावर व्यक्त

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

लैंगिक छळ झालेल्या महिलेने मुंबई पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानंतर जे काही घडलं ते महिलेने आपल्या सोशल मीडियावर सांगितलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Priya Lad

अमित राय, मुंबई, 06 ऑक्टोबर : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसांचं ब्रीदवाक्य. पण काही लोकांच्या मनात पोलिसांबाबत नकारात्मक भावना आहे. पोलीस ठाण्यात जाऊन काही फायदा नाही, असंच अनेकांना वाटतं. त्यात आपल्याकडे पुरेशी माहिती नसेल किंवा काही पुरावा नसेल तर पोलिसात जाणंच टाळतो. एका महिलेसोबत असंच काही घडलं, तिच्याकडे त्याबाबत फार माहितीही नव्हती. पण जेव्हा ती मुंबई पोलिसांकडे गेली. तेव्हा तिला जो अनुभव आला त्याबाबत ती सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे.

धानी नावाच्या ट्विटर युझरने मुंबई पोलिसांबाबतच आपला अनुभव सांगितला आहे. ही महिला सार्वजनिक ठिकाणी लैंगिक अत्याचाराची बळी ठरली. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. खरंतर कित्येक महिला सार्वजनिक ठिकाणी कधी ना कधी लैंगिक छळाला सामोऱ्यागेल्या आहेत. आपल्यासोबत जे घडलं तो गुन्हा आहे याची माहिती त्यांना असते. पण अशा गोष्टीसाठी पोलीस ठाण्यात जाऊन काहीच फायदा नाही, असं म्हणून कित्येक जणी पोलिसात जाणं टाळतात. पण अशा गुन्ह्याची तक्रार आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यासाठी आकाशपाताळ एक केलं. अखेर तब्बल 5 महिन्यांनी त्या आरोपीला शोधून काढलंच.

हे वाचा - देवीचा जागरही नाही सुटला; गरब्यातील तरुणीच्या संतापजनक कृत्यामुळे नागरिकही संतापले

महिलेने ट्विटर पोस्टमध्ये सांगितल्यानुसार, "काही महिन्यांपूर्वी मी माझ्या घराजवळील परिसरातच फेरफटका मारण्यासाठी गेले होते. तिथं मी लैंगिक छळाचे बळी ठरले. मी मदतीसाठी ओरडलेपण तोपर्यंत तो आरोपी पळून गेला.  मला त्या व्यक्तीचा चेहरा फार लक्षात नव्हता. त्यामुळे मी पोलिसांना त्याच्याबाबत काही नीट सांगू शकत नव्हते, त्याच्याबाबत पुरेशी माहिती देता येत नव्हती. पण तरी गावदेवी पोलिसांनी मला धीर दिला. त्यांनी मला जितकं माहिती होतं त्यावरच तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर ती व्यक्ती त्याच परिसरात आहे की नाही हे तपासण्यासाठी गाडीही पाठवली पण काहीच हाती लागलं नाही"

"पोलिसांनी त्या रात्री त्या व्यक्तीला शोधण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी त्या परिसराचा कोपरा कोपरा शोधला. बरेच महिने त्याचा शोध घेतला. त्यानंतर मला सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी बोलावलं. मी त्या व्यक्तीचा चेहरा विसरले, आता यातून काहीच निष्पन्न होणार नाही, असं मला वाटलं.  आज त्या घटनेला तब्बल 5 महिने झाले. गामदेवी पोलीस ठाण्याच्या संदीप माने यांना भेटले. त्यांनी मला एका व्यक्तीचा फोटो दाखवला. ही तिच व्यक्ती असावी जिने माझा लैंगिक छळ केला, याबाबत त्यांना ठाम विश्वास होता. जेव्हा मी तो फोटो पाहिला तेव्हा मी चकित झाले. कारण त्यांचा विश्वास खरा ठरला"

हे वाचा - ठाण्यात महिलेसोबत भर रस्त्यावर जोरदार मारहाण, पाहा VIDEO

"मी आशा सोडली होती पण पोलिसांनी नाही. माझ्या तक्रारीला दिलेला प्रतिसाद, त्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यानंतर आरोपीला सापडेपर्यंत न थांबणं या सर्वासाठी मी मुंबई पोलिसांची आयुष्यभऱ ऋणी राहिन"

"तुमच्यासोबतही असं काही घडलं आणि तुम्हाला तक्रार नोंदवता संकोच वाटत असेल किंवा पोलिसांकडे जाण्यात काहीच फायदा नाही, असं वाटत असेल तर मी तुम्हाला सांगेन खरंतर तुम्ही ते करायला हवं"

"तुम्ही लगेच परिणामांची नाही पण अथक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची अपेक्षा करू शकता ज्यामुळे तुम्हाला सुरक्षित वाटेल आणि पुढच्या वेळी तुम्ही एकटे बाहेर पडाल तेव्हा अधिक आत्मविश्वास मिळेल", असं सांगून या महिलेने इतर महिलांनाही प्रोत्साहन दिलं आहे.

First published:

Tags: Crime, Mumbai Poilce, Sexual harrasment, Viral