अमित राय, प्रतिनिधी ठाणे, 6 ऑक्टोबर : राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील विविधि ठिकाणी अत्याचार, बलात्कार आणि तसेच मारहाणीच्या घटना उघडकीस येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यात एका महिलेची मारहाण करण्यात आली आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ठाण्यातील टिटवाळा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी एका महिलेला जोरदार मारहाण करण्यात आली आहे. तसेच मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या महिलेला मारहाण का करण्यात आली, याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. ही घटना आज सकाळी घडली.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही महिला मिळून एक महिलेला कशाप्रकारे जोरदार मारहाण करत आहेत. दरम्यान, ही धक्कादायक घटना टिटवाळा येथील गणेश मंदिर परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे.