गांधीनगर, 6 ऑक्टोबर : नवरात्रौत्सवात सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ गुजरातच्या बडोद्याचा असल्याचं समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये ही तरुणी सिगारेट ओढत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. इतकच नाही तर नागरिकांनी तरुणीच्या संस्कारावर सवाल उपस्थित केला आहे. तरुणी गरबा खेळताना ई-सिगारेट ओढत असताना दिसत होती. 2019 मध्येच देशात ई-सिगारेटवर बंदी आणण्यात आली आहे. ई-सिरागेटची ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपनीविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं सरकारने सांगितलं होतं. मात्र तरीही ई सिगारेटची विक्री सुरूच आहे. ई-सिगारेटमध्ये पारंपरिक तंबाखूऐवजी लिक्विड केमिकल्स गरम केले जातात. ई-सिगारेट ओढणारी व्यक्ती धूर आत घेते आणि बाहेर सोडते. ई-सिगारेट आरोग्यासाठी घातक असतं. यासाठी सरकारने यावर निर्बंध आणले आहेत. केंद्र सरकारने 2019 मध्ये ई-सिगारेटवर बंदी आणली आहे. मात्र तरीही सिगारेटची दुकानं आणि ऑनलाइन मार्केटप्लेसमध्ये ई-सिगारेटची सर्रास विक्री केली जाते. Video : गरबा खेळताना तरुणीने ओलांडली मर्यादा; संतापजनक कृत्य कॅमेर्यात कैद कुठून येते ई-सिगारेट… भारतात बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात ई-सिगारेटची ऑर्डर केली जाते. त्यामुळे लपून-छपून परदेशातून ई-सिगारेट भारतात आणले जातात. नुकतच गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर डीआरआयच्या टीमने 48 कोटी रुपयांची ई-सिगारेट जप्त केले होते. चीनच्या मुंद्रा पोर्टावर पोहोचलेल्या दोन कंटेनरमधील डीआरआयला 48 कोटी रुपयांची ई-सिगारेट सापडली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.