दया शंकर शर्मा/29 जानेवारी : अनेकांच्या घरात उंदीर असतात. उंदरांना वैतागून त्यांना पळवण्यासाठी तुम्ही काय काय उपाय करत नसाल. पण माणसांना आपल्या घरात नको असलेल्या याच उंदरांनी चक्क माणसांचा जीव वाचवला आहे. हो बरोबर वाचलंत तुम्ही. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एका उंदरामुळे अख्खं कुटुंब वाचलं आहे. उंदरासारखा प्राणी माणसांसाठी देवदूत ठरल्याचं राजस्थानमधील हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे.
जाळ्यात अडकलेल्या एका सिंहाला सोडवून उंदराने त्याचा जीव वाचवल्याची गोष्ट तुम्हाला माहितीच असेल. आता हे गोष्टीतच घडू शकतं, असं तुम्ही म्हणाल. प्रत्यक्षात एवढासा उंदीर काय करणार आहे. पण आपल्याला अशक्य वाटतं ते एका उंदराने मात्र करून दाखवलं. त्याला इटुकला पिटुकला, इवलासा समजणाऱ्या माणसांचाच या उंदराने जीव वाचवला आहे. धौलपूर जिल्ह्यातील सिकरौदा गावातील ही घटना.
हे वाचा - इटुकल्या पिटुकल्या उंदराने केलं लय भारी काम; हजारो लोकांचा जीव वाचवला
एका घरात एक कुटुंब रात्री शांत झोपलं होतं. त्यावेळी एक उंदीर तिथं आला आणि इथून तिथून उड्या मारू लागला. त्यामुळे कुटुंबालाही जाग आली. घरातील सर्व सदस्य उठले. तेव्हा त्यांना विचित्र आवाज ऐकायला येऊ लागला. त्यानंतर घर हलू लागलं. भीतीने कुटुंबातील पाचही सदस्यांनी घराबाहेर पळ काढला. धावत ते घरातून बाहेर आले आणि काही मिनिटातच घर कोसळलं.
कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरी नातेवाईकही आले होते. सर्व जण वेगवेगळ्या खोलीत झोपले होते. तेव्हा अचानक कुणावर तरी उंदराने उडी मारली आणि त्यानंतर सर्वजण हडबडून उठले. त्याचवेळी काही तरी कसला तरी आवाज आला. त्यांना वाटलाच चोर आला. पण नंतर घर हलू लागलं. तेव्हा ते घरातून बाहेर पडले. घरामागे बांधलेल्या जनावरांनाही सोडून त्यांनी घरापासून दूर केलं. तेव्हाच घराच्या मागील भाग कोसळला.
हे वाचा - जगातील सर्वात जास्त काळ जगणाऱ्या उंदराविषयी माहितीये का? वय वाचून वाटेल आश्चर्य
उंदीर आपल्यासाठी देवदूत बनून आला, त्यानेच आपला जीव वाचवला असं या कुटुंबाचं म्हणणं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणती जीवितहानी झाली नाही. पण वित्तहानी मात्र भरपूर झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Other animal, Rajasthan, Viral