नामपेन्ह, 08 जून : उंदीर (Rat) म्हटलं की आपल्याला त्यांचा वैताग येतो. आपल्या घरात कायम आपल्याला त्रास देणारेच उंदीर आठवतात. पण सध्या अशा एका उंदराची चर्चा आहे, ज्याने कुणाला त्रास दिला नाहीच उलट त्याने हजारो लोकांचा जीव वाचवला (Rat saved thousand life) आहे. 5 वर्षे नोकरी केल्यानंतर आता हा उंदीर सेवानिवृत्त (Rat retired) झाला आहे. 7 वर्षांचा मगावा (Magawa). हा कोणता सामान्य उंदीर नाही, तर हजारो लोकांचा जीव वाचवणारा हीरो आहे. आफ्रिकेतील एका प्रजातीचा हा उंदीर सध्या जगभरात हीरो म्हणून प्रसिद्ध झाला आहे. हुंगून बॉम्बच्या सुरुंगांची माहिती मिळवणारा हा उंदीर. 5 वर्षे त्याने बॉम्ब स्निफिंग क्षेत्रात काम केलं आणि आता तो निवृत्त झाला आहे. दक्षिण आशियाईतील कम्बोडिया देशातील भुसूरुंगाची माहिती मिळवण्याची मोठी जबाबदारी त्याने पार पाडली. हे वाचा - OMG! तरुणाने 180 डिग्रीमध्ये फिरवली स्वतःची मान आणि…; VIDEO पाहून बसेल शॉक त्याला रितसर प्रशिक्षण देण्यात आलं होतं. बेल्जिअमची संस्था एपीओपीओने मगावाला ट्रेनिंग दिलं होतं. बॉम्बची हुंगून माहिती मिळवून तो आपल्या हँडरला देऊन त्याला अलर्ट करत असे. त्याने जवळपास 1.4 लाख स्क्वायर मीटरपेक्षा अधिक जमिनीची तपासणी केली. हे क्षेत्र म्हणजे जवळपा 20 फुटबॉलच्या मैदानांइतकं आहे. ड्युटीदरम्यान त्याने 71 लँडमाइन्स आणि 38 जिवंत विस्फोटकांची माहिती देऊन हजारो लोकांचा जीव वाचवला आहे. मगावाला ब्रिटिश चॅरिटीद्वारे मेडल देऊनही सन्मानित करण्यात आलं आहे. हा पुरस्कार आतापर्यंत कुत्र्यांसाठी आरक्षित होता. 2016 साली त्याला कम्बोडियामध्ये आणण्यात आलं तेव्हा तो फक्त दोन वर्षांचा होता. एपीओपीओच्या मते, मगावा आणखी काम करू शकतो. तो हेल्दी आहे. पण तो रिटायरमेंटच्या वयापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे तो सुस्त झालेला आहे. मगावाच्या हँडरने सांगितलं, मगावाने खूप चांगली सेवा केली. तो छोटा आहे पण त्याच्यासोबत काम करणं माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. हे वाचा - बापरे..! रस्त्यावर दिसलेली ती आकृती भूत आहे की एलियन, धक्कादायक VIDEO व्हायरल रिटायरमेंटनंतर मगावा त्याच पिंजऱ्यात राहणार आहे, ज्यामध्ये तो ड्युटीवेळी राहत होता. त्याचा दिनक्रमही तसाच राहणार. त्याची तशीच काळजी घेतली जाणार.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.