जाहिरात
मराठी बातम्या / Viral / माऊंट एव्हरेस्टमधून दररोज रात्री येतो भयावह आवाज; सत्य समजताच शास्त्रज्ञही हादरले

माऊंट एव्हरेस्टमधून दररोज रात्री येतो भयावह आवाज; सत्य समजताच शास्त्रज्ञही हादरले

माऊंट एव्हरेस्ट

माऊंट एव्हरेस्ट

15 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या एका गिर्यारोहकाने इथल्या रात्रीच्या भयावह आवाजाबाबत पहिल्यांदा सांगितलं होतं. यामागील कारण शोधल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

काठमांडू, 03 मे :  जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट च्या हजारो कथा तुम्ही ऐकल्या असतील. पण तुम्हाला माहिती आहे का यातून रात्रीच्या वेळी एक भीतीदायक आवाजही येतो. डेव्ह हॅन, ज्याने 15 वेळा एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे, त्यानेच रात्री इथं एक विचित्र आवाज ऐकू येत असल्याचं सांगितलं होतं.  हा आवाज इतका मोठा आणि भयानक आहे की तो शेकडो किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येतो. या आवाजामुळे झोपही लागत नाही. आता या आवाजाबाबत पहिल्यांदाच शास्त्रज्ञाने याचं कारण शोधल्याचा दावा केला आहे. ग्लेशियोलॉजिस्ट इव्हगेनी पोडॉल्स्की यांच्या नेतृत्वात जपानी शास्त्रज्ञांची एक टीम त्या भागात तीन आठवडे राहिली. तिथं होत असलेल्या बदलांवर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवलं. तिथून येणारे आवाज रेकॉर्ड केले. प्रत्येक आवाजाविषयी स्वतंत्रपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जपानच्या होक्काइडो विद्यापीठातील आर्क्टिक संशोधन केंद्रात काम करणारे डॉ. पोडॉल्स्की म्हणाले की, हा एक आश्चर्यकारक अनुभव होता. कारण आम्ही सुमारे 29,000 फूट उंचीवर होतो. आम्ही एव्हरेस्टच्या शिखरावर राहायचो, तिथंच खायचो. रात्रीचं तापमान -15 °C किंवा 5 °F पर्यंत खाली येताच, शिखरांवरून मोठा आवाज ऐकू आला.  जमिनीवर आल्यानंतर ते आवाज जुळले.

News18लोकमत
News18लोकमत

डॉ. पोडॉल्स्की म्हणाले आम्ही पाहिलं, ग्लेशियरच्या आत खोलवर होणारी कंपने मोजण्यासाठी आम्ही बर्फावर सेन्सर लावले होते आणि प्रत्येक क्षणी माहिती घेत होतो. हिमनदीचा स्फोट होत होता. त्यात भेगा पडल्या होत्या. सावधान! जंगली प्राण्यांपेक्षाही खतरनाक जीव तुमच्या घरात; वर्षाला घेतो 10 लाख लोकांचा बळी तापमानात झपाट्याने घट झाल्यामुळे असं घडत असल्याचं भूकंपीय डेटाच्या तपासणीतून स्पष्ट झालं. या टीमने सांगितलं की, हवामान बदलामुळे पृथ्वी सतत गरम होत आहे आणि त्याचा परिणाम इथंही दिसून आला. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सूर्य हिमालयावर मावळतो आणि तापमानात झपाट्यानं घट होते तेव्हा माउंट एव्हरेस्टच्या आसपासच्या हिमनद्यामध्ये गोंधळ होतो. उंचावरील हिमनद्या तुटायला लागतात आणि त्यांच्या विघटनाचा भयानक आवाज येतो. संशोधकांना असं आढळून आलं की हिमनदीचा बर्फ किलोमीटरमध्ये तुटतो. त्याच्या जलद पडण्यामुळे आवाज खूप मोठा आणि भयानक आहे. हे फक्त उच्च उंचीच्या भागातच घडतं. जुन्या घरातील भिंतीतून मिळाला लाखोंचा खजाना, पण पुढच्याच क्षणी मातीत मिळालं सारं संशोधकांना असं आढळून आले की हिमालयातील हिमनदीचा बर्फ विनाशकारी वेगाने वितळत आहे, ज्यामुळे लाखो लोक आणि दक्षिण आशियाई देशांच्या अर्थव्यवस्था धोक्यात आहेत. मागील सात शतकांच्या तुलनेत गेल्या चार दशकांत या प्रदेशातील विशाल बर्फाचा थर 10 पट वेगाने कमी झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात