सर्वात खतरनाक प्राणी कोणता असं विचारलं तर साहजिकच आपण सिंह, वाघ, चित्ता, बिबट्या, साप अशी नावं सांगू. पण जंगलातील या प्राण्यांपेक्षाही खतनारक प्राणी खरंतर तुमच्याच घरात राहतो आहे.
जगात असे कित्येक देश आहे, जिथं लोक जंगलातील खतरनाक प्राण्यांसोबतही अगदी आरामात राहतात. खरंतर तुम्ही विचारही केला नसेल तुमच्या घरात राहणारा अगदी छोटासा जीव तुमच्या मृत्यूचं कारण ठरू शकतो.
रोग नियंत्रण केंद्राच्या नव्या संशोधनानुसार जगातील सर्वात घातक जीव आपल्या घरात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार या जीवामुळे दरवर्षी जगभरात 10 लाख लोकांचा मृत्यू होतो.
डब्ल्यूएचओच्या मते, साप चावल्याने दीड लाख मृत्यू होता. कुत्रा चावल्याने रेबिजमुळे 60 हजार मृत्यू होता. इतके मृत्यू सिंह, चित्ता, वाघ अशा जंगली प्राण्यांच्या हल्ल्याचे काही हजारो लोकच बळी ठरतात.
तब्बल 10 लाख लोकांचा जीव घेणारा हा जीव दुसरा तिसरा कुणी नाही तर एक डास आहे. डास चावल्याने सर्वात जास्त होतो तो मलेरिया.
मलेरियामुळे 2021 साली जगभरात 6 लाखपेक्षा जास्त मृत्यू झाले. याशिवाय डास डेंग्यू, चिकनगुनिया, झिका व्हायरस आणि फाइलेरियासारखे आजारही पसरवतात.