नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : प्रत्येक आईसाठी आपल्या मुलाच्या सुरक्षेहून कोणतीही गोष्ट महत्त्वाची नसते. सकाळी उठल्यानंतर आपल्या मुलांसाठी टिफीन तयार करणं, हे जवळपास प्रत्येक आईचं पहिलं काम असतं. आपल्या मुलांना कोणताही त्रास होऊ नये, आपली मुलं उपाशी राहू नये, यासाठी आई तिचं संपूर्ण रुटीनच बदलते. परंतु घाई-गडबडीत अशा काही चुका होऊ शकतात, ज्याने सर्वांचीच चिंता वाढू शकते. अशीच चिंताजनक गोष्ट ग्रेस बेलेन या महिलेसोबत घडली, ज्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ग्रेसही सकाळी उठून आपल्या मुलांसाठी टिफीन बनवायची. परंतु काही दिवसांनी तिने टिफीनची स्थिती पाहल्यानंतर, तिला मोठा धक्का बसला. ग्रेसने सांगितलं की, तिने काही महिन्यांपूर्वी बाजारातून दोन नवे डब्बे खरेदी केले होते. हे डब्बे हिरव्या आणि निळ्या रंगाचे होते. ती याच दोन प्लास्टिकच्या डब्ब्यातून आपल्या मुलांना जेवण बनवून देत होती.
(वाचा - RBI ची घोषणा; दोन दिवसांत बदलणार बँकेसंबंधी हा महत्त्वाचा नियम )
काही दिवसांनंतर तिने टिफीनची स्थिती पाहिली आणि तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्या टिफीनमध्ये मोठ्या प्रमाणात बुरशी अर्थात फंगस (Fungus in Tiffin), अगदी लहान किडे जमा झाले होते. ग्रेसने या संपूर्ण प्रकाराची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. तिने टिफीनचे अशा खराब स्थितीतील काही फोटोही शेअर केले आहेत.
(वाचा - भयंकर! वाघांचा लोकांवर हल्ला, एका उडीत तरुणावर घातली झडप, पाहा थरारक VIDEO )
तिने या पोस्टद्वारे सर्व पालकांना आवाहन केलं की, ‘जे प्लास्टिकचे डब्बे साफ करताना त्रासदायक ठरतात, अशा डब्ब्यात आपल्या मुलांना जेवण देऊ नका’. टिफीनची अशी स्थिती पाहून ग्रेसने कंपनीला याबाबत माहिती दिली. त्या दोन डब्ब्यांपैकी एक 9 महिने जुना, तर दुसरा 12 महिने जुना होता. या प्रकरणाची गंभीरता पाहता आणि ग्रेसच्या तक्रारीनंतर कंपनीने त्या प्लास्टिक डब्ब्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून सध्या कंपनीने या घटनेनंतर वॉटर टाईट टिफीन तयार करण्यास सुरुवात केली आहे.

)







