मुंबई, 14 सप्टेंबर : लग्न (Marriage) म्हणजे केवळ दोन व्यक्ती नाही, तर दोन कुटुंबांचा (Families) मिलाप. लग्नात दोन कुटुंब एकत्र येतात. कुठल्याही मुलीच्या जीवनातील सर्वांत सुंदर प्रसंग विवाहसोहळा (Wedding) असतो. कारण ह्या प्रसंगानंतर मुलींचं जीवन पूर्णपणे बदलतं. लग्नानंतरची पहिली रात्र (First Night) तर नवविवाहित जोडप्यांसाठी (Couple) खूप खास असते. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, आफ्रिकेच्या (African Tribes) काही प्रातांमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीसंबंधी वेगळीच प्रथा आहे. येथे नवविवाहित जोडप्यासोबत लग्नाच्या पहिल्या रात्री वधूची आईदेखील झोपते. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये या रात्रीला जेवढं रोमँटिक (Filmy Romantic Suhagraat) दाखवलं जातं, प्रत्यक्षात परिस्थिती तशी नसते. अनेकदा या रात्री ते दोघं एकमेकांना समजून घेण्यात, एकमेकांसोबत गप्पा मारण्यात वेळ घालवतात. लग्नाच्या पहिल्या रात्रीशी संबंधित वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या समजुती आहेत. भारतीय संस्कृतीत अनेक ठिकाणी पती-पत्नीला लग्नानंतर सुरुवातीचा काही काळ एकत्र झोपू दिलं जात नाही. पण सर्वांत विचित्र प्रथा आफ्रिकेच्या काही प्रांतांमध्ये आहे. जिथे या खास रात्री वधूची आई तिच्यासोबत झोपते. आफ्रिकेतील अनेक देश आजही त्यांच्या जुन्या परंपरांचं पालन करतात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या चालीरीती, प्रथा, परंपरा पाळणाऱ्या बहुतेक जमाती तिथे राहतात. यापैकी अनेकजण आजही या चालीरीती, परंपरा पाळतात. अशीच एक परंपरा आफ्रिकेतील काही गावांमध्ये आढळते, जी लग्नाशी संबंधित आहे. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, त्याला बायको आणि ट्रांसजेंडर दोघांशी थाटायचा होता संसार कारण… म्हणून पती-पत्नीसोबत झोपते आई लग्न झाल्यानंतर जेव्हा पती-पत्नी यांची पहिली रात्र असते, तेव्हा त्या रात्री वधूची आईही त्यांच्यासोबत असते. म्हणजेच लग्नाच्या पहिल्या रात्री वधूची आईही नवविवाहित जोडप्यासोबत त्यांच्या खोलीत झोपते. जर संबंधित वधूची आई नसेल, तर कुटुंबातील सर्वांत वयस्कर स्त्री तिच्यासोबत झोपते. यावेळी वृद्ध स्त्री त्या रात्री वधू आणि वरांना सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्र देते, आणि वधूला त्या रात्री काय करावं, हे समजवून सांगते. तसंच दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबातील इतरांना नवविवाहित जोडप्याने लग्नाची सुरुवात चांगली केली आहे, असंही ती सांगते. जगात इतरही विचित्र प्रथा केवळ आफ्रिकेतच नाही, तर जगात अनेक ठिकाणी लग्नाशी संबंधित अशा प्रथा आहेत, ज्या विचित्र वाटतात. अशीच एक प्रथा क्युबामध्ये आहे, जिथे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना वधूसोबत नाचण्यासाठी पैसे द्यावे लागतात. तर, स्कॉटलंडच्या अनेक भागात लग्नाच्या काही आठवड्यांपूर्वी वधू-वरांवर चिखलफेक केली जाते. बायकोने स्पर्श करताच चमत्कार! अचानक धडधडू लागलं हृदय, जिवंत झाला मृत नवरा लग्नानंतरची पहिली रात्र ही नवविवाहित जोडप्यांसाठी खूपच महत्त्वाची असते. पण वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये या रात्रीच्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आहेत. काळाच्या ओघात यातील काही प्रथा, परंपरा विचित्र वाटत असल्या तरी काहीजण आजही त्या पाळतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.