मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बायकोने स्पर्श करताच चमत्कार! अचानक धडधडू लागलं हृदय, जिवंत झाला मृत नवरा

बायकोने स्पर्श करताच चमत्कार! अचानक धडधडू लागलं हृदय, जिवंत झाला मृत नवरा

प्रतीकात्मक फोटो सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो सौजन्य - Canva)

व्यक्तीला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं होतं. त्याचे अवयव काढण्याआधी त्याच्या बायकोने त्याला स्पर्श केलं आणि अचानक त्याच्या हृदयात धडधड झाली.

  • Published by:  Priya Lad
वॉशिंग्टन, 13 सप्टेंबर : सावित्री आणि सत्यवानाची कहाणी सर्वांना माहितीच आहे. सावित्रीने यमाकडून आपला नवरा सत्यवानाचे प्राण आणले होते. प्रत्यक्षात तसा जीवन-मृत्यू कुणाच्याच हाती नाही. पण काही वेळा चुकांमुळे असे चमत्कारही घडतात. असंच काहीसं घडलं ते अमेरिकेत. बायकोच्या स्पर्शाने  मृत नवराही अचानक जिवंत झाला. डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलेली एक व्यक्ची अचानक जिवंत झाली. त्याच्या पत्नीने त्याला स्पर्श करताच त्याचं हृदय धडधडू लागलं. नॉर्थ कॅरोलिनातील ही घटना. रयान मार्लोला नावाची ही व्यक्ती जिला ऑगस्ट 2022 मध्ये रुग्णालयात इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये दाखल करण्यात आलं.  त्याला लिस्टेरिया होता. त्याचा मेंदू सूजला त्यानंतर तो कोमात गेला. डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केलं. डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूची तारीख 27 ऑगस्ट दिली. रयानची पत्नी मेघन म्हणाली, डॉक्टर आले आणि रयान ब्रेनडेड झाल्याचं सांगितलं. त्यानंतर मी त्यांना रयान ऑर्गन डोनर असल्याचं सांगितलं. तेव्हा त्यांनी ऑर्गन डोनेशनची प्रक्रिया सुरू केली. हे वाचा - 'ब्रेनडेड' रुग्णाचे अवयव काढायला जाताच अचानक 'मृतदेह'...; डॉक्टरांनाही फुटला घाम त्यानंतर मेघन घरी आली आणि दोन दिवसांनंतर तिला डॉक्टरांनी फोन केला आणि रयानचा मृत्यू म्हणजे न्यूरोलॉजिकल डेथ नव्हती. त्याला  ट्रॉमेटिक ब्रेन डॅमेज असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूची तारीख 27 ऑगस्ट बदलून 30 ऑगस्ट केली. मेघन म्हणाली, डॉक्टरांनी सांगितलं त्यांच्याकडून एक चूक झाली होती. रयानचा मृत्यू झाला नव्हता. त्याची न्यूरोलॉजिकल डेथ नव्हती. त्याला ट्रॉमेटिक ब्रेन स्टेम इंज्युरी होती. हे ब्रेनडेडचं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रयानला लाइफ सपोर्टवरून हटवण्यात आलं. त्याच्या शरीरातील अवयव काढले जाणार होते.  पण डॉक्टर सर्जरी करणार त्याआधी मेघनचा भाचा रयानजवळ गेला. त्याने मुलांसोबत खेळता खेळता रयानचा व्हिडीओ चालवला.  मेघन म्हणाली, त्यानंतर रयानचे पाय हलू लागले. मला रडूच कोसळलं. मला स्वतःला खोट्या आशेत ठेवायचं नव्हतं. ब्रेनडेडमध्ये असं होऊ शकतं हे मला माहिती होतं.  त्याला पाहायला मी रूममध्ये गेली. मला त्याला जे काही सांगायचं होतं, ते मी सर्वकाही सांगितलं.  तुला लढायचं आहे कारण मी ऑर्गन डोनेशनची प्रोसेस थांबवायला जाते आहे आणि काही टेस्ट करायला जाते आहे.  तपासणीत रयानचा न्यूरोलॉजिकल मृत्यू झाला नसल्याचं समजलं. त्याच्या मेंदूतून रक्तप्रवाह होत होता. हे वाचा - वडिलांच्या अंत्यसंस्काराला गेला आणि मुलाला गमावून बसला, 24 तासात दोघांच्या मृत्यूने शिक्षक कोमात www.news.com.au च्या रिपोर्टनुसार मेघन म्हणाली, मी रयानच्या हाताला स्पर्श केला आणि त्याच्याशी बोलले त्यानंतर रयानच्या हृदयाची धडधड वाढली. आता डॉक्टर म्हणाले, की तो ब्रेनडेड नाही. पण कोमात आहे. आता तो काहीच प्रतिसाद देत नाही आहे. त्याने डोळेही उघडले नाहीत. त्याची प्रकृती खूप गंभीर आहे. (सूचना - ही माहिती इतर वेबसाईटवरील रिपोर्टनुसार देण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही)
First published:

Tags: America, Health, Lifestyle

पुढील बातम्या