16 महिन्यांची चिमुकली झोपेत रडायची, CCTV तून समोर आली धक्कादायक गोष्ट

16 महिन्यांची चिमुकली झोपेत रडायची, CCTV तून समोर आली धक्कादायक गोष्ट

16 महिन्यांची चिमुकली रडते म्हणून तिला डॉक्टरांकडे नेलं पण जेव्हा सीसीटीव्ही फूटेज पाहिलं तेव्हा अंग भीतीने थरथर कापत होतं असं आईने म्हटलं.

  • Share this:

सिंगापूर, 09 मार्च : लहान मुलं नेहमीच रडतात म्हणून अनेकदा पालकांकडून दुर्लक्ष होतं. पण त्यामागे गंभीर कारण असू शकतं. आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंगापुरमध्ये अकाउंट एक्झिक्युटीव्ह असलेल्या एमी लॉ यांची 16 महिन्यांची मुलगी मध्यरात्री अचानक झोपेत रडायला लागते. यामुळे त्रासलेल्या एमी यांनी मुलीला डॉक्टरांकडे नेलं. तेव्हा डॉक्टरांना मुलीच्या हातावर काही डाग असल्याचं सांगितलं. त्यानंतर एमीने बेबी मॉनिटरचा व्हिडिओ चेक केला. त्यात जे दिसलं त्यामुळे एमी यांना धक्काच बसला.

एमी यांनी सीसीटीव्ही फूटेजद पाहिलं तेव्हा पहिल्यांदा मोठा धक्का बसला. भीतीने अंग थरथर कापायला लागलं. एमी जेव्हा ऑफिसला जातात तेव्हा चिमुकल्या मुलीची काळजी मोलकरीण घेते. सीटीव्ही पाहिल्यानंतर समोर आलं की, मुलीच्या रडण्यामुळे वैतागून मोलकरीण चिमुकलीचे हात गरम भांडं किंवा त्यात काहीही उकळत असेल तर त्यात घालायची. मुलीच्या हातावर फोड किंवा डाग दिसू नयेत म्हणून क्रीमही लावायची.

पोलिसांना या प्रकरणी 14 जानेवारीचं सीसीटीव्ही फूटेज मिळालं. त्यामध्ये मोलकरीण 16 महिन्यांच्या चिमुकलीचा हात गरम भांड्याला लावत असल्याचं दिसत आहे. एमी यांनी फेसबुकवर एक पोस्टही केली आहे. त्यात एमी यांनी लहान मुलांची काळजी घ्या असं आवाहन इतर पालकांना केलं आहे. यासह एमी यांनी 46 सेकंदाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मोलकरीण चिमुकलीचा हात भाजताना दिसत आहे.

हे वाचा : मालकासोबत 2 हजार फुटांवरून श्वानानं मारली उडी आणि...पाहा VIDEO

पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर मोलकरणीला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणाची चौकशी केली असता आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. एमी यांच्या दुसऱ्या 8 वर्षांच्या मुलीलासुद्धा मोलकरणीने भीती घालून धमकावलं होतं. मोठ्या मुलीने मोलकरणीला चिमुकलीचा हात भाजताना पाहिलं होतं.

एमी यांनी म्हटलं की, लहान मुलगी झोपेत रडायला सुरुवात झाली त्याचवेळी मोठ्या मुलीच्या वागण्या-बोलण्यातही फरक पडला होता. त्यामुळे थोडी विचारपूस केल्यानंतर आणि व्हिडिओ पाहून जे समोर आलं ते सगळंच धक्कादायक होतं.

हे वाचा : ‘भाग जा रे कोरोना भाग जा’, महाभयंकर व्हायरसला पळवणारं भजन, पाहा व्हिडीओ

First published: March 9, 2020, 5:49 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading