जाहिरात
मराठी बातम्या / देश / ‘भाग जा रे कोरोना भाग जा’, महाभयंकर व्हायरसला पळवणारं भजन, पाहा व्हिडीओ

‘भाग जा रे कोरोना भाग जा’, महाभयंकर व्हायरसला पळवणारं भजन, पाहा व्हिडीओ

‘भाग जा रे कोरोना भाग जा’, महाभयंकर व्हायरसला पळवणारं भजन, पाहा व्हिडीओ

एखादं संकट आलं की ते दूर करण्यासाठी देवाचा धावा करण्याची प्रथा आहे. असंच भारतात आलेल्या कोरोनाव्हायरसला (Coronavirus in india) पळवण्यासाठी भजन (coronavirus song) तयार करण्यात आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 मार्च : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रकोप वाढतोय. सध्या घरोघरी याचीच चर्चा सुरु आहे. काय खावं, काय खाऊ नका असे उपायही सुचवले जातात. एखादं संकट आलं की ते दूर करण्यासाठी देवाचा धावा करण्याची प्रथा आहे, या उपायांप्रमाणेच काहींनी त्यावर मीम्सही तयार केलेत, तर काहींनी भजनं, काहींनी कोरोनावर अल्बम तयार केलेत.  राजस्थानमधल्या एका भजनी मंडळानं तर कोरोनावर एक भजन तयार केलं आहे. ‘कोरोना भाग जा, भारतमे तेरा क्या काम रे’, असे या भजनाचे बोल आहेत. आपण एकत्र येत कोरोनोचा सामना करूया असा या भजनाचा आशय आहे. संबंधित - ‘डान्स अगेन्स्ट द व्हायरस’, ‘कोरोना’पासून वाचण्यासाठी पाहा हा Video या भजनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

तर भोजपूरची प्रसिद्ध गायिका खूशबू उत्तमचं भोजपुरी गाणं ‘हैलो कौन कोरोना वायरस’चा व्हिडिओ यूट्यूबवर रिलीज झाला आहे.

आतापर्यंत भारतात 43 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर कर्नाटकातही बालवाडी आणि अंगणवाड्या काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येतील. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या नातेवाईकांची परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी श्रीनगरमध्ये जाऊन भेट घेतली. तर चेन्नईत कोरोनाशी लढण्यासाठी संबंधित विभागच्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी राज्यातल्या तयारीचा आढावा घेतला. उद्याच्या धुळवडीच्या पार्श्वभूमीवर काहींनी फुलांनी रंग खेळायचं ठरवलं आहे तर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी होळी-धुळवड न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये फुलबारी चेकपोस्टवर बांग्लादेश, नेपाळ आणि भूतानहून येणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. संबंधित -  धक्कादायक! कोट्यवधी लोकांच्या जीवावर उठणार कोरोना, लाखो भारतीयांचा होणार मृत्यू

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात