मुंबई, 09 मार्च : एका धाडसी कुत्र्यानं तब्बल 2 हजार 300 फूट उंचावरून उडी घेण्याचं धाडस केलं आहे. पॅराशूटच्या मदतीनं त्याने हे धाडस साध्य केलं आहे. सोशल मीडियावर या कुत्र्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या कुत्र्याची युझर्सकडून तुफान चर्चा होत आहे. हा कुत्रा आपल्या मालकासोबत 2 हजार फुटांवर गेला होता. त्यानं आपल्या मालकासोबत पॅराशूट जंप केली आहे. त्यांच्या या कसरतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कुत्रानं पॅराग्लायडिंग करण्याचं धाडस केलं. यावेळी कुठेही हा कुत्रा घाबरला नव्हता किंवा त्याने घाबरून गोंधळ घातला नाही. पॅराग्लायडिंगचा आनंद लुटल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्या या धाडसाचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.
हा व्हिडीओ 5 नोव्हेंबर 2019 रोजी युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. 8 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 300 लोकांनी लाईक केला आहे. कजुजा असं या कुत्र्यांचं नाव आहे. हा कुत्रा कायमच वेगवेगळ्या स्टंटमध्ये भाग घेत असतो. कुठलीही भीती न बाळगता तो स्टंट आणि सगळी आव्हानं आनंदानं स्वीकारतो. कैनाइन हा त्याचा मालक त्यांनी कजुजाला जवळ घेत 2 हजार फुटांवरून उडी मारली. कजुजा शांतपणे त्यांच्या कुशीत बसला होता. खालंचं सौंदर्य न्याहाळत होता. आणि अचानक पॅराशूट ओपन झालं. दोघांनीही निसर्गसौंदर्याचा आनंद घेत लॅण्ड केलं. हे वाचा- 103 वर्षांचा नवरा अन् 37 वर्षांची नवरी! अजब जोडप्याच्या लग्नाचा VIDEO VIRAL